Afghani व्यावसायिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना व्हिसा द्या: तालिबानचा भारताला आग्रह

50

भारत आणि तालिबानशासित (Taliban) अफगाणिस्तानची पहिली उच्चस्तरीय बैठक (Afghanistan High Level Meeting) बुधवारी दुबईत झाली. या बैठकीत अफगाणिस्थानने तेथील उद्याोजक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांना भारताने व्हिसा द्यावा अशी मागणी केली आहे. (Afghani)

अर्थात भारताच्या दृष्टीने व्हिसा मंजूर करणे तीन कारणांसाठी कठीण आहे. यात भारताची अधिकृतपणे तालिबान सरकारला मान्यता नाही. या खेरीज भारतीय गुप्तर संस्थांनी (Indian Intelligence Agency) सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच काबुलमधील भारतीय दूतासावात (Embassy of India) व्हिसा कक्ष कार्यरत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु करणे आव्हानात्मक आहे. (Afghani) तसेच दुबई येथिल बैठकीत हंगामी परराष्ट्र मंत्री अमिर खान मुत्ताकी यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री (Foreign Secretary Vikram Mistry) यांच्याकडे या मागण्या केल्याचे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ते हाफिज झिया अहमद (Hafiz Zia Ahmed) यांनी स्पष्ट केले. या संबंधी समाजमाध्यमावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – Ulhasnagar: शासकीय निरीक्षणगृहातील लोखंडी खिडकीचे गज वाकवून अल्पवयीन मुली पसार)

दरम्यान, या बैठकीत भारतात जे येतील त्यांच्याबाबत सुरक्षेचा कोणताही मुद्दा येणार नाही अशी हमी तालिबानच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आली. भारत सरकार ऑगस्ट २०२१ पासून तेथील नागरिकांना व्हीसा देताना कठोरपणे पडताळणी करते. वैद्याकीय उपचारांसाठी काही अफगाण नागरिकांना येथे येण्यासाठी परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे. पाकिस्तानशी संघर्ष सुरु असल्याने वैद्याकीय उपचारांबाबत भारताकडे अफगाण सरकार मोठ्या अपेक्षेने पहात आहे. त्याचबरोबर तेथील काही उद्याोगपती विशेषत: ड्रायफ्रुटचा व्यापार करणारे येतात मात्र ही संख्या खूपच कमी आहे.

(हेही वाचा – प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? Mumbai High Court ने मुंबई महापालिकेला घेतले फैलावर)

… तरीही तालिबानची अपेक्षा

अमिर खान मुत्ताकी हे भारताबरोबरच्या बैठकीसाठी वाणिज्य तसेच परिवहन मंत्रालयातील अधिकाऱ्यांसह आले होते असे सुत्रांनी सांगितले. तालिबान राजवटीला मान्यता देण्यात भारताला अडचण असल्याचे तेथील सरकारला कल्पना आहे. मात्र व्यवहारिक दृष्टीकोन बाळगल्यास मार्ग काढता येईल अशी तालिबानची अपेक्षा असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.