महिलांना मासिक धर्माच्या वेळेस भर पगारी रजा द्या; Atmasmanman Manch च्या अभियानास सुरुवात

179
महिलांना मासिक धर्माच्या वेळेस भर पगारी रजा द्या; Atmasmanman Manch च्या अभियानास सुरुवात
महिलांना मासिक धर्माच्या वेळेस भर पगारी रजा द्या; Atmasmanman Manch च्या अभियानास सुरुवात

आत्मसन्मान मंच यांच्यातर्फे कामकाजी महिलांना मासिक धर्माच्या वेळेस भर पगारी रजा व तसेच विद्यार्थिनींना त्यादरम्यान सुटी देण्यात यावी यासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन करून भिवंडी येथून एसआयबीसी लॉ कॉलेजला अभियान सुरू करण्यात आले आहे. (Atmasmanman Manch)

(हेही वाचा – Ravi Bishnoi Catch : रवी बिश्नोईच्या हवेत सूर मारून टिपलेल्या झेलची सोशल मीडियावर चर्चा )

चौगुले लॉ कॉलेजमधून मोहिमेची सुरुवात

नोकरी करत असलेल्या स्त्री वर्गांना मासिक धर्माच्या वेळेस दोन दिवसाची वेतन सहित रजा देण्यात यावी आणि यादरम्यान विद्यार्थी भगिनींना सुट देण्यात यावी याकरता आत्मसन्मान मंच यांनी या अभिनयाची सुरुवात केली. या अभिनयाची सुरुवात भिवंडी स्थित श्री इंद्रपाल बाबुराव चौगुले लॉ कॉलेज येथून सुरुवात करण्यात आली. यामध्ये नोकरदार महिला आणि विद्यार्थी भगिनी यांनी आपल्या हातात फलक घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आणि या फलकावर महिलांना पूर्ण पगारी दोन दिवसाची रजा व विद्यार्थी भगिनींना सुट्टी देण्याचे निवेदन करण्यात आले आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विशेष कायदा करावा जेणेकरून सर्व महिला वर्ग आणि विद्यार्थी भगिनी यांना याचा लाभ मिळण्यात यावा.

यावेळी आत्मसन्मान मंचचे अध्यक्ष माननीय नित्यानंद शर्मा यांनी म्हटले, “ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना महाराष्ट्र राज्य सरकारने अमलात आणली. त्याचप्रमाणे माझी बहीण माझी मुलगी मासिक धर्माच्या मासिक धर्माच्या असहनीय त्रासाच्या वेळेस आपण विचार करावाच हवा, या आशयाचे पत्र महाराष्ट्र सरकार यांना लिहिले असून त्याचे उत्तर पण आले आणि हा प्रस्ताव वित्त विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय यांच्या विचाराधीन आहे. तसेच आम्ही परत एक स्मरण पत्र त्यांना दिले आहे.”

या वेळेस लॉ कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती गायत्री पाटील यांनी म्हटले की, महिलांना सन्मान देऊन काम करण्याचा अधिकार आहे. मासिक धर्माच्या वेळेस येणारे मुद्दे आणि प्रश्न आमचे प्रिय भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन आहे की, त्यांनी या विषयावर विशेष लक्ष द्यावे आणि आमच्या मागण्या त्यांनी लवकरात लवकर मान्य कराव्या आणि यासंदर्भात तसा कायदा बनवून ह्या मासिक धर्माच्या वेळेस असाह्य वेळेस आम्हाला न्याय द्यावा आणि आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की, हे सरकार आमचे म्हणणे निश्चितच ऐकतील आणि सकारात्मक आणि सामाजिक प्रश्नावर विशेष सरकार निर्णय घेतील. “

यासंदर्भात नुकतेच माननीय सुप्रीम यांनी मासिक धर्माच्या दरम्यान सुट्टी च्या संदर्भात एक पिटीशन वर स्पष्टपणे सांगितले आहे की राज्य सरकार या संबंधित कुठलेही पाऊल उचलत असेल तर त्यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही. (Atmasmanman Manch)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.