‘आंबेडकरांच्या सर्व पुतळ्यांची तोडफोड करणार’; खलिस्तान समर्थक दहशतवादी Gurpatwant Pannun याचे वादग्रस्त विधान

97
'आंबेडकरांच्या सर्व पुतळ्यांची तोडफोड करणार'; खलिस्तान समर्थक दहशतवादी Gurpatwant Pannun याचे वादग्रस्त विधान
'आंबेडकरांच्या सर्व पुतळ्यांची तोडफोड करणार'; खलिस्तान समर्थक दहशतवादी Gurpatwant Pannun याचे वादग्रस्त विधान

प्रतिबंधित दहशतवादी संघटवना शीख फॉर जस्टिसचा सर्वात मोठा नेता गुरपतवंत सिंह पन्नू (Gurpatwant Pannun) याने आता डॉ. बाबासाहेब आंबेडकराविरोधात (Dr. Babasaheb Ambedkar) मोहिम सुरु केली आहे. पंजाबमधील (Punjab) जालंधर (Jalandha) येथे फिल्लौर येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. नांगेल गावात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. पन्नूने त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. दहशतवादी गटाने आंबेडकरांच्या पुतळ्यावर ‘खलिस्तान जिंदाबाद’ लिहिले. एसएफजेच्या या दलितविरोधी कृत्यामुळे दलितांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. फिल्लौर पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.

( हेही वाचा : Sambhaji Nagar च्या उपजिल्हाधिकाऱ्याना जीवे मारण्याचा कट रचणारा निघाला मनोज जरांगेंशी संबंधित)

डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ खलिस्तानी ध्वज फडकवण्यात आला आणि त्यावर ‘शीख हिंदू नाहीत’, ‘खलिस्तान जिंदाबाद’ आणि ‘एसएफजे जिंदाबाद’ अशा प्रक्षोभक घोषणा लिहिण्यात आल्या. तसेच पन्नूने (Gurpatwant Pannun) प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत १४ एप्रिल रोजी राज्यभरातील बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे हटवण्याची घोषणा केली आहे. यामागे त्यांनी असा युक्तीवाद केला की, भारताच्या संविधानामुळेच या देशात शिखांना कोणतेही अधिकार मिळाले नाहीत. खलिस्तानवादी दहशतवादी पन्नू (Gurpatwant Pannun) अनेकदा असे प्रक्षोभक व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.

अलिकडेच एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तो बुलेटप्रूफ जॅकेट घालून जिममध्ये व्यायाम करताना दिसत होता. तो सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) येथे राहतो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पन्नूच्या हत्येचा आरोप एका माजी भारतीय गुप्तचर एजंटवर केला होता. तेव्हापासून पन्नू घाबरला आहे आणि बाहेर येत नाही, असे म्हटले जात आहे. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येपासून तो भीतीच्या वातावरणात जगत आहे.

पन्नूच्या व्हिडिओचे लोकेशन ट्रेस केले जात असून माहिती मिळाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ही अशी पहिलीच घटना नाही. या वर्षी जानेवारीमध्ये अमृतसरमध्ये बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. यावरून बरेच राजकारण झाले. तथापि, ज्याने हे कृत्य केले तो दलित असल्याचे निष्पन्न झाले. आकाशदीप सिंग नावाच्या एका व्यक्तीचा व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये तो पुतळ्यावर चढून हातोड्याने तोडफोड करताना दिसतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि एफआयआर नोंदवला. (Gurpatwant Pannun)

सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज रस्त्यावर असलेल्या शहरात ही घटना घडली असल्याने या घटनेवर खूप गोंधळ उडाला. तिथून सुवर्ण मंदिराचे अंतर जास्त नाही. अमृतसरमधील डॉ. आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) हा सर्वात उंच पुतळा होता. या घटनेवरून भाजपाने सत्ताधारी ‘आप’वर निशाणा साधला होता. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या परवानगीशिवाय अशी घटना शक्य नाही, असे भाजपाने म्हटले होते. यापूर्वी, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करून संसदेत अमित शाह (Amit Shah) यांना कोंडीत पकडले होते. (Gurpatwant Pannun)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.