ग्लोबल शिक्षक डिसले गुरुजींनी दिला पदाचा राजीनामा, काय आहे कारण?

147

ग्लोबल टिचर अवॉर्ड पटकावत जगप्रसिद्ध झालेले सोलापूरचे ग्लोबल गुरुजी रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. डिसले गुरुजी यांच्यावर काही आरोप करण्यात आले असून त्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल सादर करण्यापूर्वीच डिसले गुरुजींनी राजीनामा दिल्यामुळे याची चांगलीच चर्चा होत आहे.

डिसले गुरुजींची चौकशी

रणजितसिंह डिसले यांना 2020 रोजी ग्लोबल टिचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण या ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना डिसले यांनी अधिका-यांची परवानगी घेतली नाही आणि जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे नियुक्ती झाली असताना गैरहजर राहणे असे आरोप डिसले यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यानंतर या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सीईओकडे पाठवला असून, त्याची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. त्याआधीच डिसले यांनी आपल्या शिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे.

आठ जुलै रोजी आपल्याकडे रणजितसिंह डिसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून 12 जुलै रोजी तो आपल्याकडे सादर झाला आहे. डिसले यांना एका महिन्याचा सूचना कालावधी देण्यात आला असून, आठ ऑगस्टनंतर ते कार्यमुक्त होतील, असे सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.