हवामान बदलामुळे (Climate change) जगभरातील उन्हाळ्याच्या दिवसांच्या संख्येत 41 दिवसांची वाढ झाली. याबाबतचा नवीन संशोधन अहवाल (Research report Climate change) प्रसिद्ध करण्यात आला आहे. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशनचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक ओटो म्हणतात की 2024 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष राहिले. या काळात 3700 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांनी सांगितले की जगभरातील लाखो लोकांना उष्णता आणि संबंधित आजारांमुळे विस्थापित व्हावे लागले. वातावरणातील बदलामुळे पूर, वादळ आणि दुष्काळामुळेही लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. यासोबतच ओट्टो म्हणाले की, जोपर्यंत जग जीवाश्म इंधन जाळत राहील, तोपर्यंत हवामान बदलाची समस्या वाढत जाईल. दरवर्षी तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होत राहिल्यास 2040 पर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते, असेही संशोधनात सांगण्यात आले. (Global Temperature)
संशोधन अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे
29 पैकी 26 नैसर्गिक आपत्तींचा संबंध हवामान बदलाशी होता. काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे दीडशे किंवा त्याहून अधिक दिवस उष्मा राहिला. हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लवकरच पावले उचलण्याची गरज आहे. जगभरात सुमारे 13 महिने उष्णतेची लाट कायम होती.
(हेही वाचा – Ministry : एकाच खात्याच्या दोन मंत्र्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात संभ्रम !)
नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो लोक मरण पावले
आफ्रिकन देश सुदान, नायजेरिया आणि कॅमेरूनमध्ये तीव्र उष्णतेमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तीव्र उष्णतेने उत्तर कॅलिफोर्निया आणि डेथ व्हॅलीमध्येही कहर केला. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये तीव्र उष्णतेमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
हवामान बदल टाळण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे
क्लायमेट सेंट्रलच्या क्लायमेट सायन्सच्या उपाध्यक्ष क्रिस्टीना डहल यांच्या मते, जगातील कमी लोकसंख्या असलेल्या आणि कमी विकसित देशांमध्ये अशा घटनांचा प्रभाव जास्त असतो. हवामान बदलाची समस्या टाळण्यासाठी लोकांनी जागरूक होण्याची गरज आहे.
(हेही वाचा – Hawkers : फेरीवाल्यांवर कारवाई नको, पण किमान पदपथावर बांधून ठेवलेले सामान तरी हटवा!)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community