Global Valuable Brands : भारताच्या ४ कंपन्या जागतिक १०० मौल्यवान ब्रँडच्या यादीत

Global Valuable Brands : ॲपल हा जगातील सगळ्यात मौल्यवान ब्रँड ठरला आहे.

168
Global Valuable Brands : भारताच्या ४ कंपन्या जागतिक १०० मौल्यवान ब्रँडच्या यादीत
  • ऋजुता लुकतुके

जगातील पहिल्या १०० मौल्यवान ब्रँड्सच्या यादीत भारतातील ४ कंपन्यांनी स्थान पटकावलं आहे. यात टीसीएस ही माहिती-तंत्रज्ञान सेवा पुरवणारी कंपनी ४६व्या स्थानावर आहे. कंपनीचं मूल्यांकन ४४.८ अब्ज अमेरिकन डॉलरवर आहे. तर त्यांच्या खालोखाल एचडीएफसी बँक ४३.३ अब्ज मूल्यांकनासह ४७ व्या स्थानावर आहे. एअरटेलचं मूल्यांकन २५.३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं आहे आणि त्यांचं स्थान ७३ वं आहे. तर इन्फोसिस ही आणखी एक कंपनी पहिल्या शंभरात आहे. कंपनीचं मूल्य २४.७ इतकं आहे आणि त्याचं स्थान आहे ७४वं. (Global Valuable Brands)

कांतार ब्रँड्झने हे जागतिक सर्वेक्षण केलं आहे आणि कंपन्यांचं एकूण मूल्यांकन त्यासाठी गृहित धरलं आहे. पहिल्या शंभरात असलेल्या भारतीय कंपन्यांचं एकत्रित मूल्य १३० अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. आश्चर्य म्हणजे स्टार्ट अप क्षेत्रात नवीन असलेल्या लुलुलेमन आणि कोरोना या कंपन्याही पहिल्या शंभरात आहेत. (Global Valuable Brands)

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : रुद्रांक्ष पाटील प्रकरणात अभिनव बिंद्राचा रायफल असोसिएशनला पाठिंबा)

जागतिक स्तरावर पहिल्या दहांत असलेल्या कंपन्या आणि त्यांचं मूल्यांकन पाहूया,

ॲपल – १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर

गुगल – ७७५.५ अमेरिकन डॉलर

मायक्रोसॉफ्ट – ७१२.९ अमेरिकन डॉलर

ॲमेझॉन – ५७६.६ अमेरिकन डॉलर

मॅकडोनाल्ड्स – २२१.९ अमेरिकन डॉलर

एनव्हीडिया – २०१.८ अमेरिकन डॉलर

व्हिसा – १८८.९ अमेरिकन डॉलर

फेसबुक – १६६.८ अमेरिकन डॉलर

ओरॅकल – १४५.५ अमेरिकन डॉलर

टेन्सेन्ट – १३५.२ अमेरिकन डॉलर 

तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांची वाढ ४५ टक्क्यांनी झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हे क्षेत्र तसंही चर्चेत आहे. (Global Valuable Brands)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.