जगातील टॉप संस्थांनी केलेलं एक संशोधन (Global Warming) समोर आलं आहे. या संशोधनानुसार, हिंदी महासागराचं तापमान हे जगातील इतर महासागरांपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. याचा फटका भविष्यात अरबी समुद्राला, आणि पर्यायाने भारतालाही बसणार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (IITM), ऑस्ट्रेलियातील CSIRO, अमेरिकेतील प्रिंसेटन युनिवर्सिटी, फ्रान्समधील सॉर्बोने विद्यापीठ आणि स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठ या सर्वांनी मिळून हा रिसर्च केला आहे. (Global Warming)
भविष्यात आणखी विचित्र हवामान दिसू शकतं
वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे महासागरांचं तापमान (Global Warming) वाढत आहे. यासोबतच ध्रुवांवरील बर्फ वितळून महासागरातील पाणी देखील वाढत आहे. यामुळे भविष्यात आणखी विचित्र हवामान दिसू शकतं असंही या रिसर्चमध्ये म्हटलं आहे. या रिसर्चसाठी (Global Warming) गेल्या कित्येक दशकांपासून महासागरांच्या तापमानात कशी वाढ झाली हे तपासण्यात आलं. 1950 ते 2020 या काळामध्ये महासागरांचं तापमान हे दर शतकाला 1.2 डिग्री सेल्सिअस एवढं वाढत आहे. मात्र, 2100 या वर्षापर्यंत हा दर 3.8 डिग्री सेल्सिअस एवढ्या वेगाने वाढेल अशी भीती डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी व्यक्त केली. IITM च्या रिसर्चचं नेतृत्त्व डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केलं आहे. (Global Warming)
मोठा दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होणार
यासोबतच हिंदी महासागराचं 2,000 मीटर खोलीवरील तापमान हे दर दशकाला सुमारे 4.5 झेटा-ज्यूल या वेगाने वाढत आहे. येत्या काही शतकांमध्ये हे प्रमाण वाढून तब्बल 16-22 झेटा-ज्यूल प्रतिदशक होईल असं म्हटलं जात आहे. Zettajoule हे एनर्जीचं मोठं एकक आहे. सुमारे 239 बिलियन टन TNT चा विस्फोट झाल्यानंतर जेवढी एनर्जी तयार होईल, त्याला एक झेटा-ज्यूल समजलं जातं. (Indian Ocean Temperature) या सगळ्याचा मोठा दुष्परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर होणार आहे. (Global Warming) पाण्याची पातळी वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात भूभाग पाण्याखाली जाऊ शकतो. तसंच समुद्राचं तापमान वाढल्यामुळे आतील जैवविविधता देखील नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. केवळ माशांनाच नाही, तर प्रवाळाच्या विविध प्रजातींनाही याचा फटका बसत आहे. (Global Warming)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community