GMG : गर्जे मराठी ग्लोबलची यंदा न्यू जर्सीमध्ये शिखर परिषद; महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी होणार विचारमंथन

373

देश-विदेशातील मराठी उद्योजकांना एका माळेत गुंफून त्यांच्यामध्ये व्यावसायिक आदानप्रदान करणे, प्रशिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अशा विविध उद्देशांसाठी गर्जे मराठी ग्लोबल (GMG) ही संघटना अविरत कार्यरत आहे. याकरता संस्थेने ३ आणि ४ ऑगस्ट २०२४ हे दोन दिवस न्यू जर्सी येथील एक्स्पोझिशन सेंटर येथे परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी विचारमंथन होणार आहे.

१५०० हुन अधिक व्यावसायिक उपस्थित राहणार 

2030 पर्यंत महाराष्ट्राचा जीडीपी १० अब्ज डॉलर करण्यासाठी गर्जे मराठी ग्लोबल (GMG) ही संस्था उद्योजक आणि व्यावसायिकांना सर्वोतोपरी साहाय्य करत आहे. त्यामुळे ही शिखर परिषद विशेष महत्वाची असणार आहे. या परिषदेत प्राज इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष प्रमोद चौधरी आणि पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांचे मार्गदर्शन उपस्थित उद्योजकांना मिळणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून 1500 हून अधिक व्यावसायिकांना प्रेरणा मिळणार आहे.

(हेही वाचा Yavatmal : जेवणासाठी चक्क २५ मिनिटे मतदान केंद्र बंद ठेवले; यवतमाळमधील धक्कादायक प्रकार)

AI तंत्रज्ञानाचा परिचय करून देणार 

दोन दिवसीय शिखर परिषदेत आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI या नव्या तंत्रज्ञानानाची सखोल पद्धतीने परिचय करून दिला जाणार आहे. तसेच सायबर सेक्युरिटी विषयावरही मंथन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या परिषदेत अधिकाधिक देश-विदेशातील मराठी उद्योजकांनी सहभाग घ्यावा यासाठी https://garjemarathi.com/garje-marathi-excellence-summit-2024/ या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.