Gnanavapi and Shahi Eidgah Masjid : मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी; पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती

Gnanavapi and Shahi Eidgah Masjid : काशी (Kashi) आणि मथुरा (Mathura) येथे बांधलेल्या मशिदींविषयी मुसलमानांच्या भावना नाहीत. त्यामुळे मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी.

296
Gnanavapi and Shahi Eidgah Masjid : मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी; पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती
Gnanavapi and Shahi Eidgah Masjid : मुसलमानांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी; पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांची स्पष्टोक्ती

काशी (Kashi), मथुरा (Mathura) आणि अयोध्या (Ayodhya) हिंदूंसाठी खूप विशेष आहेत. त्या भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण आणि प्रभु श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित आहेत. येथे बांधलेल्या मशिदींविषयी मुसलमानांच्या भावना नाहीत. त्यामुळे मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उत्खनानानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद (K.K. Muhammed) यांनी मुसलमानांना केले आहे.

(हेही वाचा – Shri Ram Vatika Oxygen Hub: देशातील पहिला ‘श्रीराम वाटिका’ ऑक्सिजन हब राष्ट्राला अर्पण – विजया रहाटकर)

बाबरी ढाच्याचे केले होते उत्खनन

पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी नुकतेच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्या वेळी ते बोलत होते. के.के. महंमद २०१२ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (Archaeological Survey of India) उत्तर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून निवृत्त झाले. वर्ष १९७६ मध्ये बाबरी ढाच्याचे उत्खनन करणार्‍या बी.बी. लाल यांच्या पथकाचा ते भाग होते. महंमद यांना २२ जानेवारीच्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण होते; परंतु ते शारीरिक त्रासांमुळे जाऊ शकले नाहीत.

हा एकमेव उपाय

के.के. महंमद काशी आणि मथुरा यांविषयी पुढे म्हणाले की, ज्ञानवापी आणि ईदगाह हिंदूंच्या स्वाधीन करणे, हा या समस्येवर एकमेव उपाय आहे. सर्व धर्मगुरूंनी संघटित होऊन या वास्तू हिंदूंच्या हातात द्याव्यात.

‘बाबरी ढाच्याच्या निष्कर्षांविषयी कथन केल्याने आजही मला जिवे मारण्याच्या धमक्या येतात’, असे के.के. महंमद म्हणाले. (Gnanavapi and Shahi Eidgah Masjid)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.