सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास आता CBI करणार, गोवा सरकारचा निर्णय

भाजपच्या हरियाणातील नेत्या आणि टिक-टॉक स्टार सोनाली फोगाट हिच्या मृत्यूची चौकशी आता सीबीआय करणार आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत होती, या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी सोनाली फोगाट यांची कन्या यशोधरा फोगाट यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून याप्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – “… तर उदय सामंत यांना जाळून टाकू!” पोलिसांसमोरच ठार मारण्याची धमकी; रत्नागिरीत खळबळ)

काय आहे प्रकरण

ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे सोनाली फोगाटचा मृत्यू झाला असल्याचे गोवा पोलिसांनी म्हटले आहे. सोनाली यांनी गोव्यात पोहोचल्यानंतर जेवण केले. २२ ऑगस्टरोजी रात्री ती पहिल्यांदा त्या रिसॉर्टबाहेर आल्या होत्या. त्यांनी कर्लीज रेस्टॉरन्टमध्ये डिनर केले होते. त्यानतंर त्यांचा त्याच रात्री मृत्यू झाला. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोनाली फोगाटचा गोव्यात मृत्यू झाला होता. गोव्यात आल्यानंतर अवघ्या काही तासात सोनालीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनाली यांचा स्वीय सहायक सुधीर सांगवान आणि सचिव सुखविंदर सिंग पाल यांना आता या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीने रेस्टॉरंटमधील पिण्याच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याचे कबुल केले आहे.

या प्रकरणाचा तपास धीम्या गतीने सुरू असल्याने महापंचायत बोलवण्यात आली होती. यावेळी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली होती. आता २४ सप्टेंबरला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत संपूर्ण हरियाणा आणि इतर राज्यातील प्रतिनिधी हजर राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here