गोव्यातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे (Goa Mumbai Vande Bharat Train) शनिवार ३ जून रोजी लोकार्पण होणार होते. मात्र आता हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः याला हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोरनजीक शुक्रवार (२ जून) रोजी संध्याकाळी ७ वाजून २० मिनीटांनी तीन गाड्यांचा अपघात झाला. यात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ९०० जण जखमी झाले आहेत. कोरमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर त्याच्या डब्यांची शेजारच्या रूळांवरून धावणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्सप्रेसला धडक बसली. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा अधिक वाढला.
ALERT- Goa Mumbai Vande Bharat event cancelled due to the Colamandel train accident
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) June 2, 2023
(हेही वाचा – Keshav Upadhyay : महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का?; केशव उपाध्ये यांचा परखड सवाल)
या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान कार्यालयाकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
हेही पहा –
वंदे भारत ७ स्थानकांवर थांबेल
वंदे भारत ट्रेनला गोवा-मुंबई (Goa Mumbai Vande Bharat Train) मार्गावर 7 थांबे देण्यात आले आहेत. सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिविम आणि मडगाव स्थानकांवर थांबे असतील. यापूर्वी 16 मे रोजी सीएसएमटी ते मडगाव दरम्यानच्या ट्रायल रनदरम्यान ट्रेनने सुमारे सात तासांत हे अंतर कापले होते.
Join Our WhatsApp Community