गोव्यात पॅराग्लायडिंग (Goa Paragliding Accident) करताना दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये महिला पर्यटक आणि पायलटचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना 18 जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पॅराग्लायडिंग (Paragliding) कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. (Goa Paragliding Accident)
हेही वाचा-Beed Accident: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरूणांना भरधाव ST बसने चिरडले
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात क्री पठार, केरी, परनेम येथे झाला. परवानगीशिवाय आणि योग्य सुरक्षा उपकरणांशिवाय पॅराग्लायडिंग केले जात होते. या अपघातात पुण्यातील 27 वर्षीय शिवानी आणि 26 वर्षीय नेपाळी पायलट सुमन नेपाळी यांचा उंचीवरीन कोसळून मृत्यू झाला. (Goa Paragliding Accident)
हेही वाचा-Saif ali khan वर हल्ला करणारा हल्लेखोर निघाला बांगलादेशी घुसखोर; पोलिसांकडून खुलासा
घटनेनंतर गोवा पोलिसांनी पॅराग्लायडिंग कंपनीचा मालक शेखर रायजादा, याला अटक करुन, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Goa Paragliding Accident)
हेही वाचा- मुंबईकरांना BEST Electricity चा झटका; तब्बल १५ टक्क्यांनी महागणार वीज
गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार (Alok Kumar) यांनी सांगितले की, कंपनी आणि तिच्या मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर परवानगीशिवाय आणि योग्य सुरक्षा उपकरणांची व्यवस्था न करता पर्यटकाला पॅराग्लायडिंग नेल्याचा आरोप आहे. कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच दोघांचा उंचीवरुन कोसळून मृत्यू झाला. (Goa Paragliding Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community