Goda Aarti : गंगा आरतीप्रमाणेच आता होणार गोदा आरती; शासनाने दिला ‘इतका’ निधी

"गोदा आरती" (Goda Aarti) उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला.

550
Goda Aarti : गंगा आरतीप्रमाणेच आता होणार गोदा आरती; शासनाने दिला 'इतका' निधी
Goda Aarti : गंगा आरतीप्रमाणेच आता होणार गोदा आरती; शासनाने दिला 'इतका' निधी

वाराणसी, हृषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीप्रमाणेच ‘दक्षिण काशी’ अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखिल कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मांडली होती. या “गोदा आरती” (Goda Aarti) उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला.

(हेही वाचा – Bomb : दंगलीच्या वेळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब बनवणाऱ्या जावेदला अटक)

ही कार्यवाही जलद गतीने व्हावी, यासाठी एक स्थानिक समिती गठित करण्यात येऊन मुंबई आणि नाशिक येथे संबंधितांसोबत मंत्री मुनगंटीवार यांनी बैठका घेतल्या होत्या. 29 जानेवारी 2024 रोजी मंत्री मुनगंटीवार यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये त्यांनी गोदा आरती प्रस्तावाची आढावा बैठक घेऊन सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी 1 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीत दिलेल्या सूचनांसंदर्भात प्रगतीचा आढावा घेतला होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला प्रस्ताव

जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आलेले अंदाजपत्रक शासनास सादर केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ६ फेब्रुवारी रोजी मंत्री मुनगंटीवार यांनी “आझादी का अमृत महोत्सव कोअर समिती”ची बैठक आयोजित करून गोदा आरती सुरू करण्यासाठीच्या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली होती.

जिल्हाधिकारी नाशिक (Nashik) यांनी त्यानंतर अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन दिनांक 14 फेब्रुवारी रोजी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास तात्काळ मान्यता देत निधी उपलब्ध करून वितरितही करण्यात आला आहे. त्यामुळे आता गोदा आरतीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पायाभूत सोयींसाठी मागितलेला निधी उपलब्ध झाल्याने गोदा आरतीसाठी अकरा प्लॅटफार्म तयार करणे, भाविकांना बसण्यासाठी गॅलरी, हायमास्ट, तसेच एलईडी आणि विद्युतीकरण आदी कामे वेगाने करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Goda Aarti)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.