तेलंगानाच्या (Telangana) हैदराबादमध्ये दि. १४ ऑक्टोबर रोजी कुर्मागुडा परिसरात मथ्यालम्मा मंदिरातील देवीच्या मूर्तींची अज्ञात कट्टरपंथींनी तोडफोड केली आहे. या घटनेचा स्थानिक हिंदूंनी विरोध केला आहे. येथील हिंदू (Hindu)आता आंदोलन करत असून आरोपींच्या अटकेची मागणी करत आहेत.
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पासपोर्ट कार्यालयाच्या जवळ घडली. स्थानिकांनी आरोपींना लगेच पडले. तसेच मार्कट पोलिस ठाण्यात त्यांची रवानगी केली. या घटनेचे व्हिडिेओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Telangana)
( हेही वाचा : Education fee hike : इंग्रजी शाळांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या शैक्षणिक शुल्कामुळे पालकांची कोंडी)
तेलंगाना (Telangana)भाजपचे प्रवक्त्यांने सांगितले की, सिकंदराबादच्या मोंडा मार्केटमधील मुथ्यालम्मा मंदिरातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. काँग्रेसी (Congress) सरकारमध्ये हिंदू (Hindu)आणि मंदिरे सुरक्षित नाही. नुकतेच तेलंगानातील (Telangana) हिंदू (Hindu) मंदिरांवर हल्ला झाला. राज्य सरकारला या प्रकरणी लगेच कारवाई करायला हवे होते. तसेच आरोपींवर कारवाई करायला हवी होती. पण तसे काहीही झालेले नाही, असे ही प्रवक्ते म्हणाले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, मंदिरात सर्व काही अस्थावस्थ पडलेले होते, मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. मूर्तीसोबत मंदिरातील इतर भागांचे ही नुकसान करण्यात आले होते. यामुळे हिंदूंच्या (Hindu) धार्मिक भावनांचा अपमान झाल्याचे स्थानिक हिंदूचे (Hindu) म्हणणे आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community