विश्वकप-२०२३ मधील काही सामाने वानखेडे स्टेडियम येथे होणार आहेत. (Wankhede Stadium) २४ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबरला भारतविरुद्ध श्रीलंका, ७ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान आणि १५ नोव्हेंबरला उपांत्य सामना होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची व वाहनांची गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते. या निमित्ताने म्हणून वाहतूक पोलिसांनी सामान्यांच्या दिवशी वाहतुकीत काही बदल केले आहेत. (Wankhede Stadium)
(हेही वाचा – Asian Para Games 2023 : आशियाई पॅरालिम्पिक्समध्ये ॲथलेटिक्स आणि नेमबाजीत भारताची सुवर्णाची लयलूट )
या मार्गावर आहेत बदल
वानखेडे स्टेडियम येथे पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (विशेषतः रेल्वेचा / लोकल ट्रेनचा) वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
● ‘डी’ रोड हा एन. एस. रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’ व डी ‘सी’ रोड जंक्शनपर्यंत One Way राहील.
● ‘सी’ रोड हा एन. एस. रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’ व ‘सी’ रोड जंक्शनपर्यंत One Way राहील.
● ‘ई’ रोड हा एन. एस. रोड वरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’ व ‘सी’ रोड जंक्शनपर्यंत दक्षिण वाहिनी One Way राहील.
• गेट क्रमांक ०१, ०३व ०७ करीता प्रेक्षकांनी चर्चगेट स्टेशन, तसेच डी रोडचा वापर करावा.
● गेट क्रमांक ०४ व ०५ अ करीता प्रेक्षकांनी मरीन लाईन्स, तसेच एफ रोडचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Wankhede Stadium)
चर्चगेट स्टेशनजवळील वाहनतळांची क्षमता किती ?
● सी आर टू मॉल : ५०० वाहने
● आयकर भवन २०० वाहने
● आकाशवाणी : ६० वाहने
● जीवन विमा मार्ग १५ वाहने
● इन्कम टॅक्स ऑफिस: ४० वाहने
● नाथीबाई ठाकरसी मार्ग : ३५ वाहने
● डी मुल्ला रोड : ३५ वाहने
● नाशिकराव तिरपुडे मार्ग : ४० वाहने
● मरिन लाईन्स क्रॉस रोड : २० वाहने (Wankhede Stadium) Join Our WhatsApp Community