गोखले पूल बंद: पर्यायी ४० रस्ते आणि चौकांच्या मलमपट्टीवर सुमारे २४ कोटींचा खर्च

121

अंधेरी येथील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पूर्व आणि पश्चिम वाहतुकीसाठी विविध पर्यायी रस्त्यांवरील खराब भागांची डागडुजी करण्यात येत आहे. या पूलाचा मार्ग बंद झाल्याने संलग्न  ४० रस्त्यांची मलमपट्टी करण्यात येणार असून यासाठी तब्बल २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

अंधेरी पूर्व येथील गोखले पूल हा एन.एस. फडके रोड आणि अंधेरी पश्चिम येथील सी.डी. बर्फिवाला रोड यांना जोडणारा असून गोखले पूल बंद झाल्यामुळे वांद्रे, खार, सांताक्रुझ, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव या आजूबाजुच्या विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून या पूलाअभावी पर्यायी रस्त्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परिमंडळ ३ व परिमंडळ ४ मधील ४० रस्त्यांची व चौकांची मलमपट्टी व पुनर्पृष्ठीकरणाची कामे हाती घेत निविदा मागवण्यात आली होती. या कामांसाठी मागवलेल्या निविदांमध्ये जी एल कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली असून या कामांसाठी सुमारे २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कंत्राटदाराने महापालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा सुमारे १३ टक्के कमी दर आकारला आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के आणि दोन वर्षांचा हमी कालावधी संपल्यानंतर उर्वरीत २० टक्के रक्कम दिली जाईल, असे रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा Shiv jayanti 2023: योगी सरकारच्या काळात शिवजयंतीच्या यात्रेत पोलिसांचा खोडा)

या रस्त्यांची होणार सुधारणा

  • खार सब वे ते अब्दुल हमीद चौक रस्ता
  • नेहरु रोड (मार्बल लाईन)
  • रोड नं ७, टीपीएस ०३ आणि नेहरु रोड यांचे चौक
  • वांद्रे पश्चिम जुहूतारा रोड एसएस
  •  जुहूतारा रोड व  लिंक रोड यांचे संगमस्थळ
  • वांद्रे पश्चिम एस. व्ही रोड व साने गुरुजी रोड
  • अंधेरी पूर्व मकरंद घाणेकर
  •  अंधेरी पूर्व दयालदास रोड
  • अंधेरी पूर्व शहाजी राजे मार्ग
  • अंधेरी पूर्व सहार रोड
  • अंधेरी पूर्व नवीन नागरदास रोड
  • अंधेरी पूर्व एन.एस. फडके मार्ग
  • अंधेरी पूर्व जुना नागरदास रोड
  •  अंधेरी पूर्व मोगरा सर्विस रोड
  •  अंधेरी तेली गल्ली
  •  अंधेरी एम जी रोड मार्ग
  •  अंधेरी जेव्हीएलआर मार्ग
  •  अंधेरी पूर्व निकोलसवाडी रोड
  •  अंधेरी पश्चिम एस व्ही रोड १
  • अंधेरी पश्चिम एसव्ही रोड २
  •  अंधेरी पश्चिम व्ही एम रोड
  •  अंधेरी पश्चिम जे पी रोड
  • अंधेरी पश्चिम एन एस फडके रोड
  •  अंधेरी पश्चिम न्यू लिंक रोड
  •  अंधेरी पश्चिम सीझर रोड
  • अंधेरी पश्चिम एम ए रोड
  •  अंधेरी पश्चिम इर्ला रोड
  •  अंधेरी पश्चिम दादाभाई रोड
  •  अंधेरी पश्चिम कॅप्टन सावंत रोड
  • अंधेरी पश्चिम नवीन दादाभाई रोड
  • गोरेगाव पश्चिम मेगामॉल आणि लिंक रोड यांचे संगमस्थळ
  •  गोरेगाव पश्चिम मृणालताई गोरे पुलाखालील संगमस्थळ
  • गोरेगाव शास्त्री नगर रोड १ आणि लिंक रोड संगमस्थळ
  • गोरेगाव पश्चिम जीएमएलआर आणि लिंक रोड संगमस्थळ
  • मालाड पश्चिम एस व्ही रोड आणि मार्वे रोड यांचे संगमस्थळ
  • मालाड सब वे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.