Gokhale Bridge : गोखले रोडचे पूल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार खुले

35
Gokhale Bridge : गोखले रोडचे पूल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार खुले
Gokhale Bridge : गोखले रोडचे पूल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार खुले
  • मुंबई, विशेष प्रतिनिधी

मुंबईतील बहुचर्चित गोखले रोड पुलाचे (Gokhale Bridge) बांधकाम आता युध्दपातळीवर सुरु असून येत्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहे. पूलाच्या पूर्व बाजुचे काम शिल्लक असून हे काम पूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहे. हे काम मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून त्यानंतर पुढील आठवड्यातच हे पुल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले केले जाईल, असा विश्वास पूल विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

सी. डी. बर्फीवाला रोड (C. D. Barfiwala Road) आणि एन. एस. फडके रोड (N. S. Phadke Road) यांना जोडणारा अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) रेल्वे हद्दीतील भागाची पूनर्बाधणी करण्यासाठी महापालिकेने या कामासाठी डिसेंबर २०२२ मध्ये कंत्राटदारांची नेमणूक केली होती. या कामासाठी ए.बी. इन्फ्राबिल्ड लि. या कंपनीची निवड करण्यात आली होती. अंधेरीतील गोखले पूल (Gokhale Bridge) आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने समाज माध्यमांवर महापालिका प्रशासनाला टिकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (VJTI) संस्थेची मदत घेण्यात आली. व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले हे दोन्ही पूल जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या पुलाच्या खर्चात अधिक वाढही झाली.

(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ)

अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्‍या वाहतुकीदरम्‍यान महत्‍त्‍वाचा दुवा असलेल्‍या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) पहिल्‍या टप्‍प्‍यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग सर्वसामान्‍य जनतेसाठी २६ फेब्रुवारी २०२४ पासून वाहतुकीसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. त्‍यावरून हलक्‍या वाहनांना प्रवेश सुरु आहे. अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणा-या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे (Gokhale Bridge) दुसऱया टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम नुकतेच पूर्ण झाले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच (Approach) रस्त्याचे काम एप्रिल महिना अखेरपर्यंत पूर्ण करून ३० एप्रिल २०२५ पासून गोखले पूल (Gokhale Bridge) पूर्ण क्षमतेने वाहतुकीस खुला करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर (Abhijit Bangar) यांनी दिले. या अतिरिक्त आयुक्तांच्या निर्देशानुसार पूल विभागाचे अधिकाऱ्यांनी हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

या पुलाचे काम जुन २०२५ पर्यंत पूर्ण होईल अशाप्रकारचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी प्रत्यक्षात पुलाच्या कामाची प्रगती पाहता मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे पूल वाहतुकीसाठी खुले होईल अशाप्रकारची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूल विभागाचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते यांना याबाबत विचारले असता त्यांनी या पुलाच्या बांधकाम आता युध्दपातळीवर सुरु असून मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात खुले होईल,असे स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.