Gokhale Bridge : गोपाळकृष्ण गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी ‘व्हीजेटीआय’ची मदत

दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार

999

अंधेरीतील गोखले पूल (Gokhale Bridge) आणि बर्फीवाला पूल (Barfiwala Bridge) यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने समाज माध्यमांवर महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाला टिकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना (Gokhale Bridge) करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची (Veermata Jijabai Technical Institute (VJTI)) मदत घेण्यात येणार आहे. व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच त्यांचा अवलंब करून बर्फीवाला पूल (Barfiwala Bridge) आणि गोपाळ कृष्ण (Gokhale Bridge) गोखले हे दोन्ही पूल जोडण्याच्या कामासाठी लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे.

(हेही वाचा- Nitin Gadkari : मनमोहन सिंग यांचे सरकार मुके आणि बहिरे; नितीन गडकरी यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका)

अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे (Gokhale Bridge) बांधकाम करताना त्याची उंची रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार वाढवण्यात आली, परिणामी पुलाचे पोहोच रस्ते देखील अधिक उंच झाले. याचा परिणाम म्हणून बर्फीवाला पुलाच्या (Barfiwala Bridge) दिशेने तीव्र उतार तयार झाला. वाहन चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतक्या तीव्र उतारावर आहे त्या स्थितीत जोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) (Veermata Jijabai Technical Institute (VJTI)) संस्थेची मदत घेण्यात येत असून लवकरच त्यांच्याकडून सूचना अपेक्षित आहेत. या सूचना प्राप्त होताच गोखले पुलाच्या (Gokhale Bridge) दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये बर्फीवाला पुलाची (Barfiwala Bridge) जोडणी करण्याचा समावेश करून ती कामे हाती घेण्यात येतील, असे मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation) प्रशासनाने स्पष्ट केले आहे

 दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम 

मुंबई महानगरपालिका, रेल्वे प्राधिकरण, सल्लागार यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन बर्फीवाला पूल (Barfiwala Bridge) हा गोखले पुलासोबत (Gokhale Bridge) जोडण्यासाठी अनेक पर्यायांवर विचारमंथन करण्यात येत आहे. गोखले पुलाचा (Gokhale Bridge) पहिला टप्पा दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खुला करून देण्यात आला. तर अगोदरच नियोजित केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येईल. पुलाच्या ठिकाणी व्हीजेटीआय संस्थेच्या सल्लागारांनी प्रकल्प स्थळी भेट दिली असून दोन्ही पूल जोडण्यासाठीची पद्धती त्यांच्याकडून सुचवले जाणे अपेक्षित आहे. त्यासोबतच दुसऱ्या टप्प्याचे कामही त्याचवेळी जलदगतीने करण्यात येईल.

(हेही वाचा- Nitin Gadkari : मनमोहन सिंग यांचे सरकार मुके आणि बहिरे; नितीन गडकरी यांची काँग्रेस सरकारवर जोरदार टीका)

 वाहतूक खोळंबा होण्याची शक्यता

बर्फीवाला उड्डाणपूल हा गोपाळ कृष्ण गोखले पुलासोबत जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्ग येथे दुरूस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची  आवश्यकता आहे. गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हीजेटीआय संस्थेच्या माध्यमातून सुचवण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीचे अनुकरण करत हे दोन्ही पूल जोडण्याचे काम लवकरच महानगरपालिका (Municipal Corporation) प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.