- सचिन धानजी
मुंबईतील बहुचर्चित गोखले रोड (Gokhale bridge) मुलाच्या बांधकामा बघून मुंबई महापालिका (Bmc) टीकेचे धनी बनलेले असतानाच आता या पुलाच्या रेल्वे हद्दीतील मुलाच्या खर्चातच तब्बल दहा कोटींनी वाढ झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या पुलाच्या रेल्वे हद्दीतील बांधकामासाठी ७७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु हा खर्च आता वाढवून ८७ कोटींवर जावून पोहोचलेला आहे. उंची वाढवण्यासाठी पुलाचा हा खर्च वाढला असल्याची कारणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. (Gokhale bridge)
(हेही वाचा- Loksabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले)
सी. डी. बर्फीवाला रोड (Barfiwala Bridge) आणि एन. एस. फडके रोड यांना जोडणारा अंधेरी (Andheri) येथील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या रेल्वे हद्दीतील भागाची पूनर्बाधणी तळण्यासाठी महापालिकेच्या वतीने डागाची नियुक्ती करण्यात आली होती परंतु आता या कांत कामातच वाढ झालेली आहे. महापालिकेने (Municipal Corporation) या कामासाठी डिसेंबर २०२२ मध्ये कंत्राटदारांची नेमणूक केली होती. या कामासाठी ए.बी. इन्फ्राबिल्ड लि. या कंपनीची निवड करण्यात आली होती. पावसाळा धरून ८ महिन्यांत हे काम करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात हे काम एप्रिल २०२३ मध्ये सुरू झाले होते. त्यानूसार मागील दोन महि्यांपूर्वी हलक्या वाहनासाठी हे पुल खुले करून देण्यात आले. (Gokhale bridge)
महापालिकेच्या (Municipal Corporation) पुल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पुलाच्या कामाची सुरुवात प्रत्यक्षात झाल्यानंतर रेल्वे लगतच्या उपलब्ध जागेनुसार, रेल्वे प्राधिकरणाच्या आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही टप्प्यांची व पोहोच मार्गाचे कामे संलग्नतेने एकाच वेळी करण्यासाठी रेल्वे भूभागालगत २ लोखंडी तुळया उभारणी करणे व त्यांचे रेल्वे वरील भागात लॉचिंग आदी कामे करण्याकरिता लॉचिंग प्लेटफॉर्मची जमिनीपासून उंची सुमारे ५-६ मी. ऐवजी सुमारे १४-१५ मी. वाढविणे अत्यावश्यक होते. त्यानुसार कामाच्या व्याप्तीमध्ये वाढ झाल्यामुळे कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. (Gokhale bridge)
(हेही वाचा- Lok Sabha election 2024 :लोकसभा निवडणुकीपूर्वी ४,६५० कोटींची विक्रमी जप्ती; ७५ वर्षांतील मोठी रक्कम)
अंधेरीतील (Andheri) गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांची जोडणी अपेक्षित असलेल्या ठिकाणी अंतर निर्माण झाल्याने समाज माध्यमांवर महापालिका प्रशासनाला टिकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची मदत घेण्यात आली. व्हीजेटीआय संस्थेने सुचवलेल्या शिफारशी प्राप्त होताच बर्फीवाला पूल आणि गोपाळ कृष्ण गोखले हे दोन्ही पूल जोडण्याच्या कामाला आता सुरुवात करण्यात येत आहे. या कामासाठी अतिरिक्त खर्च होणार आहे. त्यामुळे या पुलाच्या खर्चात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. (Gokhale bridge)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community