गेल्या अनेक दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्यामुळे सामान्यांना जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे. आता दुधाच्या किमतीत सुद्धा ४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गोकूळ दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शनिवारपासून ही दरवाढ लागू होणार आहे. या नव्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार हे निश्चित आहे.
( हेही वाचा : बेस्टच्या कार्डने आता करा मेट्रो-रेल्वे प्रवास! हे कार्ड कुठे मिळणार, किंमत किती? )
५८ रुपये मोजावे लागणार
काही दिवसांपूर्वी अमूल कंपनीने दूधाचे दर वाढवले होते. आता अमूल पाठोपाठ गोकूळने सुद्धा दुधाच्या किमतीमध्ये ४ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे म्हशीच्या एक लिटर दुधासाठी आता सामान्य नागरिकांना तब्बल ५८ रुपये मोजावे लागणार आहेत. हे नवे दर शनिवारपासून लागू करण्यात येणार आहेत.
नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका
दूध हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असल्यामुळे नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. परंतु गोकूळ फुल क्रिम, गायीचे दूध, टोण्ड मिल्कच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त म्हशीच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community