Gokul Milk Price Hike: गोकुळचे दूध महागले; जाणून घ्या नवे दर

161
Gokul Milk Price Hike: गोकुळचे दूध महागले; जाणून घ्या नवे दर
Gokul Milk Price Hike: गोकुळचे दूध महागले; जाणून घ्या नवे दर

राज्यातील दुध संघानी गायीच्या दुधाच्या भावात वाढ केली आहे. आता त्याच पावलावर पाऊल ठेवून कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ (Gokul Milk Union) अर्थात गोकुळनेही दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गायीच्या दुधात प्रति लिटर 2 रूपये भाव वाढ करण्याचा निर्णय गोकुळ दूध संघाने घेतला आहे. ही दरवाढ फक्त मुंबई आणि पुणे पुरतीच लागू होणार आहे. त्यामुळे या भागात प्रति लीटर ५४ रुपये ऐवजी ५६ रुपये लीटर दूध मिळणार आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे (Gokul President Arun Dongle) यांनी दिली आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमाडणार आहे.  (Gokul Milk Price Hike)

(हेही वाचा – शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक; पिक विमा योजनेविषयी काय म्हणतात Dhananjay Munde)

दूध दरवाढ झाल्यामुळे दुधापासून बनणारे पदार्थ आणि दुधाची भूकटी यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे होणारा खर्च आणि तोटा याचा ताळमेळ बसवण्यासाठी गोकुळने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे अरूण डोंगरे यांनी सांगितले. तसेच, राज्यातील इतरही दूध उत्पादक संघांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे आता या सर्व गोष्टी लक्षात घेता गोकुळलाही दुधाच्या दरात वाढ करावी लागत आहे, असेही त्यांनी सांगितले. (Gokul Milk Price Hike)

(हेही वाचा – Air pollution: महाराष्ट्रातील ‘हे’ शहर वायू प्रदूषणाच्या विळख्यात, भारतातील १० शहरांचा समावेश; वाचा सविस्तर)

दरम्यान, जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून (Mother Dairy) दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून नंदिनी (Nandini Milk) या दुधाचे दर वाढवले होते. आता गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे. (Gokul Milk Price Hike)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.