गोकुळ या दूध उत्पादक संघाकडून म्हशीच्या दुधात प्रतिलिटर दोन, तर गायीच्या दुधात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. नवे दर १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. त्यामुळे आता राजधानी मुंबईत एक लिटर दुधासाठी ६६ रुपये मोजावे लागणार आहेत.
१ ऑगस्टपासून दरवाढ
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले की, संघाशी संलग्न दूध उत्पादक म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये १ ऑगस्टपासून वाढ केली आहे. म्हैस दुधासाठी सरासरी प्रतिलिटर दोन व गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर एक रुपये वाढ केलेली आहे. २७ जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीबाबत निर्णय घेण्यात आला होता.
( हेही वाचा : बेस्ट कामगारांची १ ऑगस्टला द्वार सभा )
दुसरीकडे दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान १ ऑगस्टपासून म्हैस दूध खरेदी दर ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ४५.५० रुपये दर राहिल. तर गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर ३० रुपये होणार आहे. कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्ये वितरीत होणाऱ्या फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे. तसेच गाय दूध, टोण्ड दूध, स्टँडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community