बुधवारी महाराष्ट्रात मतदान होत आहे. राज्यात मतदानाच्या दिवशीच सोन्याच्या (Gold) दरात वाढ झाली आहे. या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी सोनं वधारलं आहे. आज सोनं 550 रुपयांनी महागले आहे. लग्नसराईचा सिझन सुरू होताच सोनं महाग झाल्याचे चिन्हे आहेत. दिवाळीच्यानंतर सोनं थोडं स्वस्त झालं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा महाग झालं आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या (Gold) दरात 550 रुपयांची वाढ झाली आहे. 77,620 रुपये प्रतितोळेर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली असून सोनं प्रतितोळा 71,150 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोनं 410 रुपयांनी महागले असून 58,220 रुपयांवर स्थिरावले आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
- 10 ग्रॅम 22 कॅरेट 71, 150 रुपये
- 10 ग्रॅम 24 कॅरेट 77,620 रुपये
- 10 ग्रॅम 18 कॅरेट 58,220 रुपये