संपूर्ण देशात एकाच दरात मिळणार सोने-चांदी! काय आहे One Nation One Gold rate योजना?

72

सोने हा भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. सणासुदीचे दिवस किंवा लग्नसराई म्हटली की सगळ्यात आधी जुळवाजुळव सुरू होते ती सोने खरेदीसाठी. सोन्याचे दर हे संपूर्ण देशात वेगवेगळे असतात. पण आता one nation, one gold rate या योजनेमुळे देशभरात एकाच दरात सोने खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांसाठी ही एक दिलासादायक बातमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाच दरात मिळणार सोने-चांदी

भारतात सोने सर्वाधिक आयात करण्यात येते त्यामुळे ज्या बंदरावर सोने उतरते तेथून देशातील वेगवेगळ्या राज्यांत त्यांचे वितरण होते. त्यामुळे विविध राज्यांत सोने पाठवण्यासाठी येणा-या वाहतूक खर्चामुळे संपूर्ण देशात सोन्याचे दर हे वेगवेगळे असतात. पण आता बुलियन एक्स्चेंजमुळे ही परिस्थिती बदलणार आहे. बुलियन एक्स्चेंजच्या श्रेणीतील ज्वेलर्स आंतरराष्ट्रीय दराने सोने खरेदी करू शकणार आहेत. त्यामुळे यात वाहतुकीचा वेगळा खर्च जोडला जाणार नाही. यामुळे सोन्याचे दरही कमी होण्यास मदत मिळेल, अशी माहिती देखील देण्यात येत आहे.

(हेही वाचाः ब्रिटन सरकार करणार बाप्पाचे अनोखे स्वागत, साकारणार सुवर्णमयी बाप्पा)

काय आहे बुलियन एक्स्चेंज

भारतीय बुलियन एक्स्चेंज म्हणजेच India International Bullion Exchange हे शेअर बाजाराप्रमाणे काम करत असते. बुलियन म्हणजे सोन्याचे बिस्कीट किंवा नाण्यांच्या स्वरुपातील सोने किंवा चांदी आणि एक्स्चेंज म्हणजेच देवाणघेवाण. या बाजारात सोन्या-चांदीची खरेदी-विक्री करण्यात येते.

ग्राहक देखील करू शकतात खरेदी

याआधी केवळ मोजक्या बँका किंवा केंद्रीय बँकांकडून मंजुरी मिळालेल्या संस्थांनाच देशात सोने किंवा चांदीची आयात करता येत होती. पण बुलियन एक्स्चेंजवर ग्राहकांना देखील सोन्या-चांदीची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे देशभरात सोने आणि चांदीचे एकच दर लागू होणार असून, सोन्याची आयातही पारदर्शी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.