Gold in Possession : जगात कुठल्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं? यात भारताचा नंबर कितवा?

Gold in Possession : भारतीय घरांमध्ये नेमकं किती सोनं आहे?

1122
Gold in Possession : जगात कुठल्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं? यात भारताचा नंबर कितवा?
  • ऋजुता लुकतुके

सोन्याचं महत्त्व गुंतवणुकीसाठीही मोठं आहे. इतर गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी सोन्याकडे पाहिलं जातं. कारण, सोन्याच्या दरात खूप मोठे उतार चढाव होत नाहीत. शिवाय देशाच्या तिजोरीत सोनं असेल तर त्याचाही चलन स्थिर राखण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे प्रत्येक देशाकडे किती सोनं आहे याचा अहवाल जागतिक स्तरावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतो.

भारतात सोन्याला वेगळंच महत्त्व आहे. इथं गुंतवणुकीपेक्षा दागिन्यांसाठी सोन्याकडे पाहिलं जातं. घरी सोनं साठून राहिल्यामुळे ते अर्थव्यवस्थेत खेळतं राहत नाही. तरी लोक घरी दागिन्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. भारतात लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये महिला सोन्याच्या दागिन्यांना पहिली पसंती देतात. आपल्या देशात प्रत्येक घरातील महिलांकडे थोड्या प्रमाणात सोनं असतेच. धार्मिक कार्यक्रमांवेळी सोन्याच्या दागिन्यांचं वापर करण्यास पसंती दिली जाते. भारतातील महिलांकडे नेमकं किती सोनं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जगभरातील कोणत्या देशातील महिलांकडे सर्वाधिक सोनं आहे. भारताचा त्या यादीत कितवा क्रमांक लागतो हे जाणून घेतलं पाहिजे. (Gold in Possession)

(हेही वाचा – Wasim Akram : वसिम अक्रमच्या पत्नीने शेअर केला एक फोटो, ओळखणंही झालं मुश्किल)

या देशात केला जातो सोन्याचा सर्वाधिक वापर 

भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांचा वापर अधिक केला जातो. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक सोन्याच्या दागिन्यांचा आवड असल्याचं पाहायला मिळतं. भारतात काही राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिला सोन्याच्या दागिने घालतात. जागतिक सोने परिषदेच्या एका रिपोर्टनुसार भारतातील महिलांच्या जवळ २४ हजार टन सोनं आहे. हे सर्वाधिक सोनं असल्याचं मानलं जातं. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या रिपोर्टनुसार भारतातील महिलांकडे जगातील सोन्यापैकी ११ टक्के सोन्याचे दागिने आहेत. भारतातील महिला जेवढे सोनं वापरतात ते जगातील सोन्याचा वापर करणाऱ्या इतर टॉप पाच देशांच्या तुलनेत अधिक आहे.

आपल्या देशात सर्वाधिक सोनं दक्षिण भारतातील महिला वापरतात. दक्षिण भारतात देशातील एकूण सोन्यापैकी ४० टक्के सोनं आहे. तामिळनाडू राज्यात सर्वाधिक २८ टक्के सोनं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमध्ये सोन्याचे दागिने सर्वाधिक आहेत. अमेरिकेकडे ८ हजार टन सोनं आहे. जर्मनीकडे ३,३०० टन सोनं आहे. त्यानंतर इटलीजवळ २,४५० टन, फ्रान्सकडे २,४०० टन, रशियाकडे १,९०० टन सोनं आहे. भारतानं आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ब्रिटनमध्ये ठेवलेलं १०० टन सोनं देशात परत आणलं आहे. १९९१ मध्ये भारताकडे परकीय चलन कमी असल्यानं देशातील सोनं परदेशात ठेवावं लागलं होतं. (Gold in Possession)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.