Gold Rate : गाठली एकसष्ठी! अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ

138

देशात पुन्हा एकदा सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61145 रुपयांवर पोहोचला. हा आतापर्यंतचा उच्चांकी दर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमएक्ससी) बुधवारी सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली. सोन्याच्या दराची ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे.

( हेही वाचा : ‘सीआरपीएफ’मध्ये तब्बल १ लाख ३० हजार जागांवर लवकरच मेगाभरती!)

यासोबतच चांदीमध्येही मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोन्याचा भाव 50 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होता. म्हणजेच सोन्याने 6 महिन्यांत 20 टक्क्यापेक्षा जास्त परतावा दिला आहे. मंगळवारी संध्याकाळी सोन्याचा वायदा 60954 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला, जो बुधवारी 61113 रुपयांच्या आसपास उघडला. सोन्याच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 61,360 रुपये एवढा असून, 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,250 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या भावातही वाढ आहे. चांदीच्या दरात एका दिवसात 2490 रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी चांदीचा भाव 77,090 रुपयांवर पोहोचला आहे, जो दर मंगळवारी दिवशी 74,600 रुपये होता. यापूर्वी 20 मार्च रोजी सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली होती, जी अजूनही सुरूच आहे. सर्व विक्रम मोडीत काढत सोन्याने 60 हजारांच्या पुढे झेप घेतली आहे. दुसरीकडे सोन्याच्या वाढत्या किमतींबाबत तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.