Gold Price Surge : एका दिवसांत सोन्याच्या किमती ६,००० रुपयांनी कशा वाढल्या?

जगावर आता व्यापारी युद्धाची भीती पसरली आहे.

102
Gold Price Surge : एका दिवसांत सोन्याच्या किमती ६,००० रुपयांनी कशा वाढल्या?
Gold Price Surge : एका दिवसांत सोन्याच्या किमती ६,००० रुपयांनी कशा वाढल्या?
  • ऋजुता लुकतुके

मागच्या काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या किमतींनी शुक्रवारी पुन्ह एकदा विक्रमी उसळी घेतली आहे. दिवसभरात ६,२५० रुपयांच्या वाढीसह राजधानी दिल्लीत सोन्याचे भाव १० ग्रॅममागे ९६,००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने हा विक्रमी भाव असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सराफा बाजार तसंच किरकोळ गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा हा परिणाम असल्याचं सराफा असोसिएशनचं (Bullion Association) म्हणणं आहे. (Gold Price Surge)

जागतिक बाजारात पुन्हा एकदा अमेरिका व चीन यांच्यामध्ये व्यापारी युद्ध भडकण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यातून आलेल्या अनिश्चिततेमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. ९९.९ टक्के शुद्धतेचं सोनंही ९०,००० चा आकडा ओलांडून पुढे गेलं आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात पहिले चारही दिवस सोन्याच्या किमतीत अभूतपूर्व घसरण झाली होती. पण, त्यानंतर एका दिवसांत सोनं सावरताना दिसत आहे. गुरुवारी ८९,७५० रुपयांवर बंद झालेलं सोनं शुक्रवारी अचानक ६२५० रुपयांच्या उसळीसह ९६,००० रुपयांवर बंद झालं. (Gold Price Surge)

(हेही वाचा – IPL 2025, KKR vs CSK : ऋतुराज गायकवाड कोलकाता विरुद्ध का खेळला नाही?)

चांदीच्या (Silver) किमतीतही या कालावधीत वाढ झाली असून चांदी २,२०० रुपयांच्या उसळीसह किलोमागे ९५,५०० रुपयांना मिळत आहे. गुरुवारी धातू बाजार महावीर जयंतीच्या सुटीनिमित्त बंद होता. त्यामुळे शुक्रवारी बाजारातील संवेदनशीलता खूप जास्त होती. महत्त्वाचं म्हणजे जूनच्या वायदे बाजारातही सोनं चढ्या भावात विकलं जात आहे. सध्या जूनच्या वायद्यांमध्ये सोन्याची किंमत ९३,५०० रुपये इतकी आहे. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये सोन्याच्या भावांत झालेली ही वाढ हे डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिरता आणि अमेरिकी, चीन व्यापार युद्धाची भीती यामुळे आली असल्याचं एलकेपी सेक्युरिटीजचे कमोडिटी विषयातील तज्ज जतीन त्रिवेदी (Jatin Trivedi) यांनी म्हटलं आहे. (Gold Price Surge)

जागतिक धातू बाजारातही सोन्याच्या किमती एका आऊन्ससाठी ३,२३७ अमेरिकन डॉलरपर्यंत (American Dollar) वर गेल्या आहेत. २ एप्रिलला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी नवीन आयात शुल्क वाढ जाहीर केल्यानंतर सोनं आंतरारष्ट्रीय बाजारात पहिल्यांदाच ३,००० अमेरिकन डॉलरच्या वर गेलं होतं. पण, त्यानंतरच्या चार दिवसांत नफारुपी विक्रीमुळे ते खालीही आलं होतं. (Gold Price Surge)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.