Gold Rate Fall : सोन्याच्या किमती वाढायला हव्यात तिथे कमी का होत आहेत?

एका दिवसांत सोने २,५०० रुपयांनी कमी झालं आहे.

184
Gold Rate Fall : सोन्याच्या किमती वाढायला हव्यात तिथे कमी का होत आहेत?
Gold Rate Fall : सोन्याच्या किमती वाढायला हव्यात तिथे कमी का होत आहेत?
  • ऋजुता लुकतुके

जगात मंदीची भीती असेल तर अशावेळी करायची सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. सोन्याचं ते पारंपरिक मूल्य आहे. पण, तेच सोनं अलीकडे जागतिक व्यापारी युद्धामुळे पसरलेल्या अस्थिरतेतही खाली जात आहे. अडीअडचणीला उपयोगी पडणारं सोनं सध्या गुंतवणूकदारांना धोका देत आहे. मागच्या दोन सत्रांमध्ये सोन्याच्या भावात ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत ही घट ३ टक्क्यांची किंवा २,५०० रुपयांची होती.

भारतीय बाजारांत आता सोन्याने १३ मार्च २०२५ नंतरचा नीच्चांक गाठला आहे. २४ कॅरेट शुद्धता असलेलं सोनं १० ग्रॅम मागे ९०,००० रुपयांवर सध्या स्थिरावलं आहे. मागच्या वर्षभरात सोन्याला आलेली उभारी ही जागतिक आर्थिक अस्थिरता, महागाई दर वाढण्याची भीती आणि मध्यवर्ती बँकेनं सोनं जमवण्याची घेतलेली भूमिका यामुळे आली होती. पण, ह ट्रेंड आता बदलताना दिसत आहे. मॉर्गन स्टॅनले चेजने या परिस्थितीची मीमांसा करताना संस्थागत गुंतवणूकदारांनी सोन्याची केलेली विक्री हे कारण दिलं आहे. ‘गुंतवणूकदार संस्था आपलं नुकसान किंवा मार्जिन भरून काढण्यासाठी आपल्याकडे असलेलं सोनं विकत आहेत.’ (Gold Rate Fall)

(हेही वाचा – Mukhyamantri Majhi Ladki Bahin योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढली; नेमके कारण काय ?)

मागच्या एका आठवड्यात जगभरातील गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांत ६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर (American Dollar) इतकी संपत्ती गमावली आहे. जपान, युरोपमधील शेअर बाजार (Stock market) १० टक्क्यांनी खाली आले आहेत. अशावेळी सोनंही खाली येणं हे नेहमीच्या कलापेक्षा विपरित आहे. ‘जाणकार आणि गुंतवणूकदारांना सर्वच असेट क्लासमध्ये आणखी पडझड होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे सोन्याकडेही लोकांचा कल कमी होत आहे. लोक सध्या पैसे हातात ठेवण्याच्या म्हणजे रोखता वाढवण्याच्या मागे आहेत. अमेरिकन फेडरल बँकेनं (American Federal Bank) व्याजदर कपात केली तर यात थोडा फरक पडू शकेल,’ असं मॉर्निंगस्टार संशोधन संस्थेचे जॉन मिल्स (Jon Mills) यांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे. (Gold Rate Fall)

जागतिक स्तरावरच सोन्याचे दर कमी होतायत. त्याचा परिणाम भारतावरही जाणवतोय. त्यातच भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. भारतातील ८० टक्के सोनं हे आयात केलेलं असतं. अशावेळी भारतात सोनं आयात करण्यासाठी जास्त परकीय चलन खर्च होत आहे. त्याचाही परिणाम भारतात सोन्याच्या किमतीत होत आहे. (Gold Rate Fall)

(हेही वाचा – रॉयल्टी बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे आदेश)

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की, मॉर्निंगस्टार या अमेरिकन संशोधन संस्थेनं इथून पुढे सोन्यात आणखी २८ टक्के घसरणीचं भाकीत केलं आहे. ‘सोनं इथून पुढे एका आऊन्समागे १६० अमेरिकन डॉलरने (American Dollar) स्वस्त होऊ शकतं. हा अमेरिकन बाजारातील नाही तर जगभरातील अंदाज आहे. सोन्यात गेल्या वर्षभरात आलेली रॅली ही लोकांच्या मनातील भीती होती. अस्थिरतेत सोन्यातील गुंतवणूक वाढली होती. ती आता कमी होऊन जस जसे इतर बाजार सुरक्षित होतील, सोन्यातील गुंतणूक कमी होऊन इतर ठिकाणी वाढत जाईल. अशावेळी सोनं आणि इतर धातूही कमी होतील,’ असं जॉन मिल्स (Jon Mills) यांनी अहवालात म्हटलं आहे. (Gold Rate Fall)

भारतातही सोन्याच्या दरांत येत्या काही दिवसांत मोठे उतार चढाव बघायला मिळतील असा तज्जांचा होरा आहे. ‘येत्या काही दिवसांत सोन्याचे दर १० ग्रॅममागे ८७,३०० रुपये ते ८९,१०० रुपयांच्या आसपास असतील. जागतिक वातावरणाचे परिणाम भारतातही सोन्यावर प्रामुख्याने दिसतील,’ असं व्हीपी कमोडिटीजचे राहुल कलंत्री यांनी म्हटलं आहे. (Gold Rate Fall)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.