-
ऋजुता लुकतुके
अमेरिकेत ट्रंप प्रशासनाने घेतलेले अमेरिकेच्या हिताचे काही निर्णय आणि त्यातून जागतिक बाजारात पसरलेली अशांतता तसंच व्यापारी युद्दाचं सावट याचा फायदा सोन्याला मिळताना दिसतो आहे. सोन्याची झळाळी वाढत असून मुंबई आणि दिल्ली या उपनगरांसह इतर शहरांमध्ये सोन्याचे दर प्रती १० ग्रॅमसाठी ८५,००० रुपयांच्या वर पोहोचले आहेत. फक्त १ जानेवारीपासूनच्या सोन्याच्या किमतीचा आढावा घेतला तर त्यात ९,२०६ रुपयांनी वाढ झाल्याचं दिसून येईल. (Gold Rate in India)
(हेही वाचा- Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकात भारत – पाक सामन्यातील पंच ठरले, जाणून घ्या नावं?)
इतकंच नाही तर जाणकारांनी मार्चपर्यंत हे दर ९०,००० रुपयांपर्यंत थडकतील, असाही अंदाज व्यक्त केला आहे. ११ फेब्रुवारीला मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात १० ग्रॅममागे ६६५ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे पहिल्यांदाच सोन्याने ८५,००० रुपयांचा आकडा गाठला आहे. नवी दिल्लीत हा भाव सर्वाधिक ८७,२१० रुपये इतका आहे. सोन्याच्या वाढीची चार प्रमुख कारणं देता येतील. (Gold Rate in India)
वर म्हटल्या प्रमाणे, २० जानेवारीला अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच अमेरिका फर्स्ट धोरणाअंतर्गत चीन, ब्राझील, कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर त्यांनी आयातकर वाढवला. त्याचा परिणाम म्हणून या देशांनीही अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर कर वाढवला. ट्रंप यांनी नंतर आपला शुल्कवाढीचा निर्णय तात्पुरता स्थगित केला असला तरी एक प्रकारे जागतिक व्यापारी युद्धाला तोंड फुटलं आहे. आणि त्यामुळे जागतिक आर्थिक वातावरणात सध्या अनिश्चितता आहे. त्याचा फायदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला मिळतो आहे. (Gold Rate in India)
(हेही वाचा- Ind vs Eng, 3rd ODI : तिसऱ्या सामन्यातही आताचा संघ कायम हवा – संजय बांगर)
डॉलरच्या तुलनेत सतत घसरणाऱ्या रुपयामुळेही भारतासाठी परकीय व्यापार महाग झाला आहे. आणि अशावेळी इतर गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमी परताव्यापेक्षा पारंपरिक गुंतवणूक म्हणून लोकांचा कल सोन्याकडे वाढू लागला आहे. सोन्याचा कमी पुरवठा आणि वाढती मागणी यामुळेही सोन्याच्या किमती देशात वाढत आहेत. तर शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील लोकांची गुंतवणूक वाढत आहे. (Gold Rate in India)
सोन्याच्या किमती या वर्षभरात आणखी वाढतील असा जाणकारांचा अंदाज आहे. केडिया ॲडव्हायझरीचे संस्थापक अजय केडिया यांनी तर या वर्षभरात सोनं ९०,००० रुपयांच्या वर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘मार्चपूर्वीच सोनं ८५,००० च्या वर जाईल असा कुणालाही अंदाज नव्हता. पण, चित्र भराभर बदललं. आता किमती झपाट्याने ९०,००० रुपयांकडे जाताना दिसत आहेत. आणि याच वर्षांत ते नवं उद्दिष्ट पार होईल, असं दिसतंय. पारंपरिक गुंतवणुकीबरोबरच ईटीएफमधील गुंतवणूकही वाढत आहे. आणि एकूणच लोकांचा सोन्याकडे कल आहे. हा बदल वर्षभर कायम राहील,’ असं केडिया यांनी म्हटलं आहे. (Gold Rate in India)
(हेही वाचा- Mahakumbh : काही प्रसारमाध्यमांमुळे साधूंची बदनामी)
सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांनी भारतीय मानक अर्थात, बीआयएस शिक्का असलेलं आणि हॉलमार्क सोनंच खरेदी करावं असा सल्लाही केडिया यांनी दिला आहे. तसंच सोनं साठवण्यापेक्षा ईटीएफ किंवा म्युच्युअल फंडाचा पर्यायही त्यांनी सुचवला आहे. (Gold Rate in India)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community