कोल्ह्यांमुळे चिपी विमानतळ पडतेय बंद! काय आहे भानगड?

106

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुप्रतिक्षेनंतर चिपी विमानतळ सुरु झाले. कारण मागील २० वर्षांपासून या विमानतळाच्या उभारणीमध्ये अनेक विघ्न आली. त्यावर मात करून अखेर हे विमानतळ सुरु झाले खरे मात्र आता नव्या समस्येने हे विमानतळ ग्रासले आहे. या विमानतळाच्या धावपट्टीवर तब्बल २५ ते ३० सोनेरी कोल्हे वावरत असतात, धावत असतात.

विमाने उतरण्यास अडचणी

या कोल्ह्यांना बाजूला करणे मात्र सहजासहजी शक्य होत नाही. स्थानिक वन विभाग आणि विमान प्राधिकरण यांना या कोल्ह्यांना पकडण्यासाठी परवानगीची गरज आहे. त्यांना पकडून इतरत्र हलवण्याची गरज आहे. विमानतळाच्या परिसरात किमान २५-३० कोल्ह्यांचा वावर सुरु आहे. त्यामुळे मुंबईवरून येणाऱ्या विमानांना उतरण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे त्यांना उशीर होत आहे.

(हेही वाचा टास्क फोर्स म्हणतेय शाळा बंदच ठेवा, शिक्षण विभागाचा विरोध!)

विमानतळाच्या भोवती गवत

दररोज मुंबईहून सिंधुदुर्ग या मार्गावर विमानाच्या ३ फेऱ्या होतात. प्रत्येक वेळी सिंधुदुर्ग विमानतळावर आल्यावर वैमानिकांना या कोल्ह्यांच्या धावपट्टीवरील उपस्थितीमुळे अडचणी येत आहे. तसे ते रिपोर्ट करत आहेत. या विमानतळाच्या २७५ एकर भूभागाच्या भवती संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. या विमानतळाच्या भोवती मोठं मोठे गवत उभे राहिले आहेत. त्यामुळे कोल्ह्यांचा वावर वाढत आहे. सोनेरी कोल्हे यांना वन्य जीव संरक्षण कायद्याच्या शेड्युल २ अंतर्गत सुरक्षा देण्यात आली आहे. ते फळे, पक्षी आणि छोटे जनावरे खातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.