पदवीधरांना सुवर्णसंधी; सरकारी नोकरी हवी आहे? 7 हजार जागांवर भरती

सरकारी नोकरी मिळवण्याची स्वप्ने पाहणारे आणि ख-या अर्थाने या परीक्षांची तयारी करणा-यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. पदवीधारांसाठी सरकारी, विविध संस्था, तसेच बॅंकांमध्ये तब्बल 7 हजारांहून अधिक जागांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

या पदांवर भरती सुरु

  • भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 38 हजार 926 जागा असून, त्यापैकी मराठी, कोकणी भाषा येत असलेल्यांसाठी राज्यातील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण 3 हजार 24 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदासाठी 6 जूनला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
  • दिल्ली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये वरिष्ठ निवासी पदासह विविध पदांच्या 413 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी 16 मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.
  • भारतीय नौदल यांच्या आस्थापनेवरील फार्मासिस्ट, फायरमन आणि पेस्ट कंट्रोल वर्कर पदाच्या 127 जागांसाठी भरती होणार असून, अर्ज 26 जूनपर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
  • भारतीय सैन्य दलात नाई, चौकीदार, सफाईवाला, आरोग्य निरिक्षक, स्वयंपाकी, व्यापारी मेट, वाॅर्ड सहाय्यक आणि वाॅशरमन पदाच्या एकूण 158 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
  • हिंदुस्तान उर्वरक व रसायनच्या आस्थापनेवर मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक अधिकारी, सहायक व्यवस्थापक, अधिकारी, अभियंता आणि कंपनी सचिव पदाच्या 179 जागा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आरोग्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या 411 जागांसाठी भरती.
  • हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण 179 जागा भरती. भारतीय स्टेट बॅंकेमध्ये प्रणाली अधिकारी, कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी, वरिष्ठ विशेष कार्यकारी आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी पदाच्या एकूण 36 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  • तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या 3 हजार 614 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या विभागांसह इतरही विभागांमध्ये रिक्त पदांची भरती होत आहे. संबंधित जाहिराती ऑनलाईन उपलब्ध आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here