मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यासाठी विविध रिक्तपदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत एकूण २५ जागांवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! थकित देणी गणेशोत्सवाआधी देण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश)
विविध पदांच्या एकूण २५ जागा
डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या २२ जागा व शिपाई पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता
डाटा एंट्री ऑपरेटर पदांकरता पदवी परीक्षा उत्तीर्णसह MS-CIT परीक्षा आणि मराठी (३०) आणि इंग्रजी (४०) टायपिंग अर्हता धारण केलेली असावी.
मुलाखतीचे ठिकाण
अधिष्ठातांचे दालन, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रूग्णालय मुंबई
मुलाखतीची तारीख
दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखत घेण्यात येईल.
कोकण रेल्वे भरती
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत उपमुख्य विद्युत अभियंता, मुख्य विद्युत अभियंता पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ आणि १६ सप्टेंबर २०२२ (पदांनुसार) आहे.
- पदाचे नाव – उपमुख्य विद्युत अभियंता, मुख्य विद्युत अभियंता
- पद संख्या – २ जागा
- वयोमर्यादा –
उपमुख्य विद्युत अभियंता – 64 वर्षे
मुख्य विद्युत अभियंता – 58 वर्षे - अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाइन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठवण्याचा पत्ता –
मुख्य विद्युत अभियंता – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, 6 वा मजला, प्लॉट क्र.6, सेक्टर-11, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र. - अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ आणि १६ सप्टेंबर २०२२ (पदांनुसार)