सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! थेट मुलाखतीद्वारे केली जाणार निवड; या ठिकाणी पाठवा अर्ज

127

मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यासाठी विविध रिक्तपदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत एकूण २५ जागांवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! थकित देणी गणेशोत्सवाआधी देण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश)

विविध पदांच्या एकूण २५ जागा

डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या २२ जागा व शिपाई पदाच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता

डाटा एंट्री ऑपरेटर पदांकरता पदवी परीक्षा उत्तीर्णसह MS-CIT परीक्षा आणि मराठी (३०) आणि इंग्रजी (४०) टायपिंग अर्हता धारण केलेली असावी.

मुलाखतीचे ठिकाण

अधिष्ठातांचे दालन, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रूग्णालय मुंबई

मुलाखतीची तारीख

दिनांक २३ ऑगस्ट २०२२ रोजी मुलाखत घेण्यात येईल.

कोकण रेल्वे भरती 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत उपमुख्य विद्युत अभियंता, मुख्य विद्युत अभियंता पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ आणि १६ सप्टेंबर २०२२ (पदांनुसार) आहे.

  • पदाचे नाव – उपमुख्य विद्युत अभियंता, मुख्य विद्युत अभियंता
  • पद संख्या – २ जागा
  • वयोमर्यादा –
    उपमुख्य विद्युत अभियंता – 64 वर्षे
    मुख्य विद्युत अभियंता – 58 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाइन
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता –
    मुख्य विद्युत अभियंता – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, 6 वा मजला, प्लॉट क्र.6, सेक्टर-11, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ आणि १६ सप्टेंबर २०२२ (पदांनुसार)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.