सुवर्ण मंदिराची पुन्हा एकदा चर्चा; जर्नेलसिंग भिंद्रनवालेनंतर आता अमृतपाल सिंग 

153

खलिस्तानींचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या अनुयायांना १ ते १० जून १९८४ दरम्यान ठार करण्यात आले. त्याला ऑपरेशन ब्लू स्टार नाव देण्यात आले. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई ज्या ठिकाणी करण्यात आली ते अमृतसर, पंजाबमधील शीख धर्माचे पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिर होते. पुन्हा त्याच ठिकाणी, त्याच दहशतवादी संघटनेचा नेता येत आहे आणि त्याच्याविरोधात पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांनी  सुवर्ण मंदिराला गराडा घातला आहे.

खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग अद्यापही फरार आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणाची पोलीस अमृतपाल सिंगचा शोध घेत आहेत. अशात महत्वाची घडामोड समोर आली आहे. अमृतपाल सिंग हा पंजाबमध्येच असल्याचे सांगण्यात येत आहे. अमृतपाल सुवर्ण मंदिरात अकाल तख्तवर जाऊन आत्मसमर्पण करू इच्छित असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी सुवर्ण मंदिराच्या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. अमृतपाल सिंग एका आंतरराष्ट्रीय माध्यमाला मुलाखत देण्यासाठी जालंधरला जात होता. पहिल्यांदा संपूर्ण प्रकरणाची माहिती द्यावी आणि नंतर पंजाब पोलिसांकडे आत्मसमपर्ण करावे, असा अमृतपाल सिंगचा प्लॅन होता. पण, याची माहिती पंजाब पोलिसांना आधीच मिळाल्याने अमृतपालचा प्लॅन फसला. मंगळवारी अमृतपाल सिंग होशियारपूर येथे लपल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. फगवाडा येथे एका अज्ञात कारमध्ये अमृतपाल सिंग असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाठलाग केला. पण, मरनिया येथील गुरूद्वाऱ्याजवळ कारमधील लोक गाडी सोडून फरार झाले. यानंतर मरनिया गाव आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले. तसेच, अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री ‘घर ते घर’ तपासणी केली.

(हेही वाचा माहीमपाठोपाठ नवी मुंबई विमानतळानजीक मजार, दर्गा; राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका)

कोण आहे अमृतपाल सिंग?

अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आहे. काही दिवसांपूर्वीच तो दुबईतून भारतात आला आहे. ‘वारिस पंजाब दे’ संघटनेची स्थापन पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याने केली होती. दीप सिद्धू याच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंगने ‘वारिस पंजाब दे’ संघटनेवर कब्जा केला. अमृतपाल सिंगचे दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.