भारतीय अर्थव्यवस्थेला आले चांगले दिवस; GDP ८.४ टक्क्यांनी वाढला

544
सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीतील जीडीपीचे आकडे जाहीर केले आहेत. हे आकडे भारतीय अर्थव्यवस्था वेगाने अग्रेसर होत असल्याची ग्वाही देतात. तिसऱ्या तिमाहीतील जीडीपी ग्रोथ ८.४ टक्के असल्याचे सरकारने घोषित केले आहे. अर्थव्यवस्थेचा हा आकडा अंदाजापेक्षा खूप अधिक आहे. देशातील मॅन्युफॅक्चरिंग अॅक्टिव्हिटीज आणि सरकारी खर्चातील तेजी यामुळे GDP चा वेग आणखी वाढला आहे. यापूर्वीच्या तिमाहीतील GDP Growth ७.६ टक्के होता.

देशाचा ग्रोथ रेट ७.६ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता 

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. महत्वाचे म्हणजे, जागतिक बँकेपासून ते IMF पर्यंत सर्वांनीच तिचे कौतुक केले आहे. आता तिसऱ्या तिमाहीचे आकडेही हेच दर्शवत आहेत. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने २९ फेब्रुवारीला जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर तिमाहीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वेगाने वाढले आहे. वर्ष दर वर्ष ८.४ टक्क्यांचा हा वृद्धीदर २०२२च्या दुसऱ्या तिमाहीनंतरचा सर्वात चांगला वृद्धीदर आहे. जो ६.६ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा खूप अधिक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा हा वेग बघता NSO ने आपल्या दुसऱ्या अंदाजात आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी देशाचा ग्रोथ रेट ७.६ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. यापूर्वी जानेवारी २०२४ मधील जारी आपल्या पहिल्या अंदाजात चालू आर्थिक वर्षासाठी GDP Growth Rate ७.३ टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.