कोरोना काळात असलेल्या निर्बंधांमुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचा-यांना Work from Home(WFH) ची सुविधा दिली होती. पण लॉकडाऊन नंतरही आता अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवले आहे. पण नाईलाजाने सुरू झालेली वर्क फ्रॉम होमची सुविधा आता आरामदायी कामाच्या पद्धतीचा भाग बनली आहे. अनेकांना घरात राहून काम करणे आवडत असल्यामुळे वर्क फ्रॉम होमबाबत नवे नियम लागू करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.
कर्मचा-यांना जास्तीत जास्त वर्षभर घरातून काम करण्याची सुविधा या नव्या नियमांनुसार देण्यात येऊ शकते. तसेच ऑफिसमधील 50 टक्के कर्मचा-यांनाच हा नियम लागू करता येऊ शकतो. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करुन नव्या नियमांची माहिती दिली आहे.
(हेही वाचाः धक्कादायक! इतक्या भारतीयांनी स्विकारलं पाकिस्तानचं नागरिकत्व, केंद्र सरकारने दिली माहिती)
कोणाला करता येणार WFH?
मुख्य म्हणजे वर्क फ्रॉम होमचे हे नवे नियम विशेष आर्थिक क्षेत्र(SEZ)युनिट्ससाठी लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे SEZ क्षेत्रात येणा-या कंपन्या आपल्या कर्मचा-यांना नव्या नियमांनुसार घरुन काम करण्याची परवानगी देऊ शकतात. उद्योग क्षेत्रातून याबाबतची मागणी करण्यात येत असल्यामुळे वाणिज्य मंत्रालयाकडून याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. घरुन काम करण्यासाठीचे नियम हे 2006 मध्येच तयार करण्यात आले असून, त्यामध्ये आता 43ए हा नवा नियम अधिसूचित करण्यात आला आहे.
आयटी क्षेत्रातील कर्मचा-यांना फायदा
या नव्या नियमांचा आयटी क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. आपल्या कर्मचा-यांना ही सुविधा देण्यासाठी कंपन्यांना आपल्याकडील कर्मचा-यांचा एकूण आकडा जाहीर करावा लागणार आहे, तसेच SEZ च्या विकास आयुक्तांची परवानगी देखील घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः सर्वसामान्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, ‘या’ पदार्थांवर लागणार नाही जीएसटी)
Join Our WhatsApp Community