सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार २८ सप्टेंबर रोजी महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयाचा फायदा कर्मचाऱ्यांसमवेत पेन्शनधारकांनाही होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. दिवाळीआधी ही घोषणा करण्यात आल्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
( हेही वाचा : आता QR कोडद्वारे शेअर करा इंस्टाग्राम पोस्ट आणि Reels)
महागाई भत्त्यामध्ये वाढ
५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळपास ६२ लाख पेन्शनधारकांना ३८ टक्के डीए मिळणार आहे. डीएची वाढीव रक्कम जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. यानुसार कर्मचाऱ्यांना मागील महिन्याची थकबाकी दिली जाईल.
डीए वाढल्यानंतर कामगारांचे पगार ६ हजार ८४० ते २७ हजार ३१२ रुपयांपर्यंत वाढणार आहे. सरकारने यावर्षी मार्चमध्ये डीएमध्ये सुधारणा केली होती. यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए ३४ टक्के झाला. नव्या घोषणेनुसार आता डीए ३८ टक्के झाला आहे.
डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ७२० रुपयांची वाढ होते. जर केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार १८ हजार रुपये असेल तर ३४ टक्क्यांनुसार त्याला ६१२० रुपये डीए मिळत होता आणि आता ३८ टक्के डीए झाल्यावर कर्मचाऱ्यांना ६ हजार ८४० रुपये डीए मिळेल.
Join Our WhatsApp Community