केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना तेजस एक्स्प्रेसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यांच्या अधिकृत दौऱ्यासाठी त्यांना ही सूट देण्यात येईल. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने परिपत्रक जारी केली आहे. यामध्ये आता तेजस एक्स्प्रेसमधून सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत किंवा कमी दरात प्रवास करता येणार आहे.
( हेही वाचा : SBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ! आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू शकता गुंतवणूक)
सरकारी कर्मचाऱ्यांना सूट
सरकारी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत दौऱ्यासाठी तेजस एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवासात सवलत दिली जाणार आहे. ट्रेनिंग, ट्रान्सफर, रिटायरमेंट ट्रॅव्हल, सरकारी कामकाजासाठी फिरणे यावेळी ही सूट लागू असेल.
अर्थ मंत्रालयाने जारी केल्याप्रमाणे पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना प्रिमियम ट्रेन, प्रिमियम तात्काळ ट्रेन, राजधानी, शताब्दी, दुरांतो या ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी आहे. या ट्रेनमधून केंद्र सरकारी कर्मचारी कमी दरात किंवा विनामूल्य प्रवास करू शकतात. अर्थ मंत्रालयाने तेजस एक्स्प्रेसचा समावेश प्रिमियम ट्रेनच्या यादीमध्ये केला आहे.
प्रिमियम ट्रेन
तेजस एक्स्प्रेस ही IRCTC द्वारे चालवली जाणारी, कॉर्पोरेट हायस्पीड ट्रेन आहे. या रेल्वेचा कमाल वेग १६० किमी प्रतितास आहे. २० डब्यांची ही देशातील पहिली प्रिमियम ट्रेन आहे. या सर्व डब्यांना स्वयंचलित दरवाजे आहेत. शिवाय या गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये चहा-कॉफी व्हेडिंग मशिन बसवण्यात आले आहे. प्रत्येक सीटवर एलसीडी स्क्रिन आणि वाय-फाय सुविधा या ट्रेनमध्ये आहे.
Join Our WhatsApp Community