महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ७०० कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी मंजूरी शिंदे-फडणवीस सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी राज्य सरकारने ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात त्यांचा लाभ होणार आहे.

राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार अतिरिक्त भार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे शेतकरी नियमित कर्जफेड करणार आहेत, त्यांना ५० हजार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सभागृहात घोषित केला होता. त्यानंतर या योजनेसाठी १६ सप्टेंबर २०२२ रोजी २ हजार ३५० कोटी वितरित केले होते. मग १८ ऑक्टोबरला ६५० कोटी आणि त्यानंतर आता ७०० कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ४ हजार ७०० कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

ठाकरेंचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी केले पूर्ण 

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी योजना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ काही मिळाल नाही. पण उद्धव ठाकरे यांचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दाखवलं.

(हेही वाचा – केंद्राकडून राज्याला नववर्षाचे गिफ्ट! विविध योजनांसाठी ५०० कोटी मंजूर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here