गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी महापालिकेची ऑनलाइन एक खिडकी कार्यपद्धती ४ जुलैपासून सुरू झाली आहे. या एक खिडकी कार्यपद्धतीमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक, अग्निशमन दलाची वेगळी परवानगी घ्यायची आवश्यकता नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने मंडप परवानगीची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी मंडप परवानगीसाठी शंभर रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. पालिकेने २०२३ पासून पीओपी मूर्तीवर बंदी असल्याचे जाहीर केल्यामुळे मूर्तिकार यंदा हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याच्या मागे लागले आहेत.
गणेश मंडळांची गैरसोय दूर करण्यासाटी मुंबई महापालिकेने विविध प्राधिकरणांच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी एक खिडकी योजना सुरू केल्यामुळे मंडळांना दिलासा मिळाला आहे.
( हेही वाचा : पावसाळ्यात आस्वाद घ्या खमंग भजीचा! देशातील प्रसिद्ध भजींचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? )
मंडप परवानगीसाठी असा करा अर्ज
- ४ जुलैपासून अर्ज स्वीकारण्याची संगणकीय कार्यप्रणाली सुरू झालेली आहे.
- अर्ज https://portal.mcgm.gov.in या वेब पोर्टलवर मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२२ संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे.
- अडचणींबाबत संबंधित सहाय्यक आयुक्तांची मदत घेणे.
- गणेश मंडळांनी ऑनलाइन प्रणालीतून हमीपत्र डाऊनलोड करावे त्यावर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या करून अपलोड करावे व अर्जासह सादर करावे
- हमीपत्र – https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/Online%20Services/Maintenance/GanapatiIndemnityBondMarath.pdf
पीओपी मूर्ती टाळा
- पीओपी पाण्यात विरघळत नाही त्यामुळे असा मूर्तीचा गाळ, विहीर, तलाव आणि जलाशय यांच्या तळाशी साचतो.
- पीओपीमुळे जलाशयातील जिवंत झरे बंद होतात.
- या मूर्तीवरील रासायनिक रंगामुळे जल प्रदूषण होऊन जलचरांना सुद्धा धोका निर्माण होतो.