गणेश चतुर्थीचा सण (Ganeshotsav Pandals) अवघ्या काही दिवसांवर आला असताना राज्य सरकारकडून गणेशोत्सव मंडळांसाठी गोड बातमी देण्याची तयारी सुरू आहे. राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना यंदा मंडपाचे भाडे माफ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासाठी आग्रही आहेत.
(हेही वाचा – Chhagan Bhujbal : भुजबळांना आवरा; रा. स्व. संघाची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना)
ठाणे जिल्हा समन्वय संस्था, मुंबई गणेशोत्सव (Ganeshotsav Pandals) समिती, अखिल भारतीय सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र व कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सर्व महापालिका हद्दीत परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात यावी, गणेशोत्सवात मंडपाचे भाडे आकारण्यात येऊ नये, गणेशोत्सव समितीच्या सदस्यांवर गणेशोत्सवात दाखल झालेले गुन्हे माफ करावे, विसर्जन घाटावर मोठी जागा उपलब्ध करावी अशा व इतर प्रमुख मागण्यांबाबत उपमुख्यमत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, यासंदर्भात (Ganeshotsav Pandals) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांसोबत सर्व संस्थाना घेऊन संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल व सर्व समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community