‘या’ बँकांमध्ये तुमचं अकाऊंट आहे? मग तुम्हाला लोनसाठी होणार फायदा! RBI चा मोठा निर्णय

130

Reserve Bank of India(RBI) कडून पतधोरणाच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. बुधवारी आरबीआयने रेपो रेटमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे, त्यामुळे आता कर्ज घेणे महागले आहे. पण त्यासोबतच आता रिझर्व्ह बँकेकडून शहरी सहकारी बँका(Urban Co-op. Banks) आणि ग्रामीण सहकारी बँकांची(Rural Co-op. Banks)गृह कर्ज देण्याची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे या बँकांमध्ये अकाऊंट असलेल्या खातेधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

(हेही वाचाः नोटांवरील गांधींचा फोटो हटवणार? RBI ने केला मोठा खुलासा)

कर्ज देण्याच्या मर्यादेत वाढ

शहरी सहकारी बँकांची होम लोन देण्याची क्षमता आता 70 लाख रुपयांवरुन 1 कोटी 40 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर ग्रामीण सहकारी बँका आता 30 लाख रुपयांऐवजी 75 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज देऊ शकतात. त्यामुळे या बॅंकांतील खातेधारकांना जास्तीचे कर्ज घेणे शक्य होणार आहे.

(हेही वाचाः रेपो रेट वाढला की सर्वसामांन्यांची कर्ज का महागतात? वाचा सोप्या शब्दांत)

बिल्डर्सनाही मिळणार कर्ज

नव्या नियमांनुसार, ज्या बँकांची एकूण उलाढाल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्या बँका आता प्रत्येक व्यक्तीला 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकणार आहेत. याआधी ही मर्यादा केवळ 20 लाख रुपये इतकीच होती. तसेच ग्रामीण सहकारी बँका आता निवासी योजनांशी संबंधित असलेल्या बांधकाम व्यावसायिकां(बिल्डर्स)नाही कर्ज देऊ शकणार आहेत.त्यामुळे आरबीआयकडून घेण्यात आलेला मोठा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.