IIT विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ४ हजार विद्यार्थ्यांसाठी बांधणार नवे वसतिगृह

44
IIT विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ४ हजार विद्यार्थ्यांसाठी बांधणार नवे वसतिगृह
IIT विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! ४ हजार विद्यार्थ्यांसाठी बांधणार नवे वसतिगृह

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी पवई  येथे, विद्यार्थ्यांसाठी नव्याने वसतिगृह बांधण्यात येणार आहे. सध्या आयआयटी पवई (IIT Pawai) येथील विद्यार्थीसंख्या १३ हजारांवरून १६ हजारांपर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने आयआयटी मुंबई प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी, सध्याच्या सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने आयआयटी मुंबईत (IIT Mumbai) तब्बल २००० कोटी खर्चून २० नव्या इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे.  (IIT)

यामध्ये वसतिगृहाच्या इमारतींमध्ये (IIT Hostels Pawai) नव्याने ४ हजार विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. या इमारती १० मजली आणि ४५ मीटर उंचीच्या असतील, अशी माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शिरीष केदारे (Shirish Kedare, Director of IIT Mumbai) यांनी दिली. सध्या आयआयटी मुंबईत १३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या वसतिगृहात १२ हजार विद्यार्थ्यांच्या सुविधा उपलब्ध आहेत. (IIT)

नव्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी संख्येत आणखी वाढीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या जुलै महिन्यापर्यंत आणखी २ हजार विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच पुढील तीन वर्षात त्याच क्षमतेच्या आणखी एक वसतिगृह उभारले जाईल, यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आयआयटी मुंबईत एकाचवेळी १६ हजार विद्यार्थी वास्तव्य करू शकणार आहेत, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

(हेही वाचा – आता धर्मांध मुसलमानांचा ‘ग्रंथालय जिहाद’ व्हाया Love Jihad; तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर)

मात्र आता ४५ मीटरपर्यंत इमारती उभारणीची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार सर्व सुविधांनी सुसज्ज २० इमारती उभारल्या जात आहेत. यामध्ये शैक्षणिक संकुले, कर्मचारी निवासस्थाने, वसतिगृह आदींचा समावेश आहे. आयआयटीत सध्या सर्व इमारतींचे मिळून ९ लाख चौरस मीटर एवढे असलेले बांधकाम क्षेत्र वाढून १६ लाख चौरस मीटरपर्यंत जाईल, अशी माहिती फायनान्स, पायाभूत सुविधा विभागाचे उपसंचालक प्रा. के. व्ही. कृष्ण राव यांनी दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.