एमएमआरडीएकडून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 यांचा पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणार आहे. या दोन्ही मेट्रोची कामे जवळजवळ पूर्ण झाली असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणपत्र प्राधिकरणाला प्राप्त झालं आहे.
दर दहा मिनीटांनी एक मेट्रो
दहिसर पू्र्व ते डहाणूकर वाडी अशी मेट्रो धावणार आहे. मेट्रो 7 आरे ते दहिसर पूर्व याची किमान तिकीट 10, तर कमाल तिकीट 40 रुपये असणार आहे.आरे ते डहाणूकर वाडी असा मेट्रोचा टप्पा सेवेत दाखल होईल. दर दहा मिनीटांनी एक मेट्रो धावणार आहे.
मेट्रोचे थांबे
मेट्रो लाईन 2 अ ते दहीसर पूर्व ते डीएन नगर. ही मेट्रो आनंद नगर, ऋषी संकुल, आयसी काॅलनी, एकसर, डाॅन बाॅक्सो, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव, आदर्श नगर, शास्त्री नगर, डीएन नगर.
( हेही वाचा: तर तीन मजली उड्डाणपूल बांधलं असतं…गडकरींचा महाराष्ट्र सरकारला सल्ला! )
मेट्रो लाइन 7
अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व
स्थानके- दहीसर, ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अॅंड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व)