मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी : तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढली पाच टक्क्यांनी

94

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील पाणी साठ्याची पातळी दहा टक्क्यांपेक्षाही खाली गेल्याने मुंबईकरांसमोर जलसंकट निर्माण  होते की काय अशी भीती वाटत असतानाच मुसळधार पावसामुळे तलाव क्षेत्रांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होताना दिसत आहे. सर्व तलाव आणि धरणांमधील पाण्याची पातळी वाढताना दिसत असून मंगळवार सकाळपर्यंत या सर्व तलावांमध्ये १४. ८० टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तलावांमधील पाण्याच्या पातळीत अशाचप्रकारे जलदगतीने वाढ होईल अशा प्रकारची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

मुंबईला दरदिवशी अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर अर्थात ३८० कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असून ०५ जुलै २०२२ पर्यंत या सर्व धरणांमध्ये एकूण २१ हजार ४१६ कोटी लिटर पाण्याचा साठा जमा आहे. तलाव पातळीत वाढ होत असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत ४ टक्के एवढा कमी साठा आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून मुंबईसह इतर शहरांमध्ये तसेच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळून तेथील परिसर जलमय झाला आहे. त्यातच नाशिक शहरात झालेला मुसळधार पाऊस हा मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट असून येथील पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारी तलाव व धरणे प्रामुख्याने भरली जातात. पाण्याची पातळी दहा टक्क्यांपेक्षाही कमी गेल्याने मागील आठवड्यांपासून महापालिका प्रशासनाने मुंबईत दहा टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने तलावांमध्ये पाण्याची पातळीत वाढ होऊन ०१ ऑक्टोबरपर्यंत ही सर्व तलाव व धरणे फुल्ल झाल्यास मुंबईकरांच्या वर्षभराची तहान भागवण्याचा प्रश्न निकाली निघतो.

( हेही वाचा: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता )

एकूण आवश्यक पाणी साठा :

  • १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर( १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष)
  • ५ जुलैमधील मागील तीन वर्षांतील पाण्याच्या पातळी
  • सन २०२२ :  २१ हजार ४१६ कोटी लिटर( एकूण साठ्याच्या  १४.८०टक्के)
  • सन २०२१ :   २७हजार ४४९ कोटी लिटर( एकूण साठ्याच्या १८.९६ टक्के)
  • सन २०२०:    ११ हजार ५५०कोटी लिटर ( एकूण साठ्याच्या ०७.९८टक्के)

सर्व तलाव आणि धरणांमधील एकूण साठा आणि सध्याचा साठा

  •  अप्पर वैतरणा: एकूण क्षमता : २२ हजार ७०६ कोटी  लिटर, ( सध्याचा पाणी साठा : शून्य)
  • मोडक सागर : एकूण क्षमता : १२ हजार ८९२ कोटी  लिटर, ( सध्याचा पाणी साठा :४ हजार ९३६ कोटी लिटर)
  • तानसा : एकूण क्षमता : १४ हजार ५०८ कोटी  लिटर,  (सध्याचा पाणी साठा : ०१ हजार ६७८ कोटी  लिटर)
  • मध्य वैतरणा : एकूण क्षमता१९ हजार ३५३ कोटी  लिटर, ( सध्याचा पाणी साठा : ०२ हजार १०८कोटी  लिटर)
  • भातसा : एकूण क्षमता : ७१ हजार ७०३ कोटी  लिटर, ( सध्याचा पाणी साठा : ११ हजार ५९७ कोटी  लिटर)
  • विहार :  एकूण क्षमता : ०२हजार ७६९ कोटी  लिटर,  (सध्याचा पाणी साठा : ३३५ कोटी  लिटर)
  • तुळशी :  एकूण क्षमता : ८०४ कोटी  लिटर,  (सध्याचा पाणी साठा : ३३५कोटी  लिटर)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.