रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बदल्यांसाठी लागू होणार नवा नियम

106

रेल्वे कर्मचाऱ्यांची पोस्टिंग बऱ्याच बेळा त्यांच्या राहत्या घरापासून लांब होते अशावेळी कर्मचाऱ्यांची बदली घरापासून जवळ, सोयीस्कर विभागात झाल्यास किंवा एखादा म्युच्युअल बदली करणारा व्यक्ती तयार झाल्यास काम सोपे होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वानिमित्त भारतीय रेल्वेच्या १३ लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. रेल्वे बोर्डाने तयार केलेल्या नव्या पॉलिसी अंतर्गत १३ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना बदल्या करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. १५ ऑगस्ट २०२२ पासून या निर्णयाची संपूर्ण देशात अंमलबजावणी करण्यात आली आहे.

( हेही वाचा : AC Local : प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! एसी लोकलच्या आणखी १० फेऱ्या वाढणार)

कर्मचाऱ्यांसाठी मॉड्यूल

एखाद्या कर्मचाऱ्याला आंतरविभागीय बदली हवी असल्यास याआधी अडचणी येत म्हणूनच १५ ऑगस्ट २०२२ पासून रेल्वे मंत्रालयाने ट्रान्सफर मॉड्यूल लागू केले आहे. या अंतर्गत सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) या रेल्वे सॉफ्टवेअर बनवणाऱ्या संस्थेने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे मॉड्यूल तयार केले आहे. याला एचआरएमएस(HRMS) असे नाव देण्यात आले आहे. आंतर विभागीय बदलीचे सर्व अर्ज या प्रणालीद्वारे दाखल केले जाती.

बदली प्रक्रियेत पारदर्शकता

या नव्या प्रक्रियेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होईल. जेव्हा कोणत्याही कर्मचाऱ्याची बदलीची वेळ येईल तेव्हा संबंधित कर्मचारी याद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकेल. एकाच जागेसाठी दोन अर्ज प्राप्त झाल्यास प्रथम अर्ज करणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. पर्यवेक्षक इतर अधिकारी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या बदल्यावर त्यांचे मत या HRMS प्रणालीद्वारे मांडू शकतील. परंतु बदल्यांचा अंतिम निर्णय फक्त डीआरएम किंवा एडीआरएमचा असेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.