रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ एक्सप्रेस गाड्यांना जोडले जाणार कायमस्वरूपी अतिरिक्त डबे

129

पुणे – दानापूर आणि कोल्हापूर – धनबाद एक्सप्रेसच्या डब्ब्यांत कायमस्वरूपी वाढ करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून रेल्वेने पुढीलप्रमाणे कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : गुरूवारी पुण्यातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद )

या गाड्यांच्या डब्यांमध्ये कायमस्वरुपी वाढ

ट्रेन क्रमांक 12149/12150 पुणे – दानापूर एक्स्प्रेसला पुणे दिनांक १ ऑगस्ट २०२२ पासून आणि दानापूर येथून ३ ऑगस्ट २०२२ पासून एक अतिरिक्त तृतीय वातानुकूलित कोच कायमस्वरूपी वाढ करण्यात येईल.

गाडीसाठी सुधारित संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, ७ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी यासह एक गार्ड ब्रेक व्हॅन, एक पँट्री कार.

ट्रेन क्र.11045/11046 कोल्हापूर – धनबाद एक्स्प्रेसला दिनांक २१ जुलै २०२२ पासून कोल्हापूर येथून आणि २५ जुलै २०२२ पासून धनबाद येथून एक शयनयान कोचची कायमस्वरूपी वाढ करण्यात येईल.

गाडीसाठी सुधारित संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ गार्ड ब्रेक व्हॅन.

( हेही वाचा : बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करत तोडगा काढणे आवश्यक! )

दोन्ही ट्रेनच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांच्या पीएनआरची स्थिती तपासावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.