सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून महाराष्ट्र सरकारने जूनपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगांतर्गत तिसऱ्या हप्त्या मिळण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा झाले होते. आता सरकारने जूनपासूनच तिसरा हप्ता पाठवण्यास सुरूवात केली आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे.
( हेही वाचा : AC Local : मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार! एसी लोकलच्या आणखी १० फेऱ्या वाढणार)
कर्मचाऱ्यांना कसा मिळणार हप्ता?
महाराष्ट्रात २०१९ मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला होता. २०१९-२० पासून आणखी पाच वर्षात कर्मचाऱ्यांना त्यांची थकबाकी पाच हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. याअंतर्गत आतापर्यंत कर्मचाऱ्यांना दोन हप्ते मिळाले आहेत. आता तिसऱ्या हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणे सुरू झाले आहे. आता तिसऱ्या हप्त्यानंतर चौथा हप्ता २०२३ मध्ये तर, पाचवा हप्ता २०२४ मध्ये जमा करण्यात येणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सर्व जिल्हा परिषदा, सरकारी अनुदानित शाळा आणि इतर सर्व सरकारी अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा लाभ मिळणार आहे.
- गट अ – ३० ते ४० हजार रुपयांची वाढ
- गट ब – २० ते ३० हजार रुपयांची वाढ
- गट क – १० ते १५ हजार रुपयांची वाढ
- त्याखालील गटांसाठी ८ ते १० हजार रुपयांची वाढ