IT sector : आयटी क्षेत्र देणार गुड न्यूज, सणासुदीमुळे कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी वाढली

देशाच्या अर्थचक्राला गती मिळणार

116
IT sector : आयटी क्षेत्र देणार गुड न्यूज, सणासुदीमुळे कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी वाढली
IT sector : आयटी क्षेत्र देणार गुड न्यूज, सणासुदीमुळे कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी वाढली

श्रावण महिना सुरू होताच, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीनिमित्त देशभरात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे सणासुदीच्या काळात देशाच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे सणासुदीपूर्वी हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे.

आय टी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांवर गेल्यावर्षीपासून घरी बसण्याची वेळ आली होती. यावेळी आयटी आणि टेक कंपन्या डिसेंबर तिमाहीपर्यंत बंपर भरती करतील, असा अंदाज आहे. ४४ टक्के नोकर भरती आयटी क्षेत्रात वाढेल, असा अंदाज मॅनपॉवर एम्ल्यॉयमेंट आऊटलूक सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा – FIFA Awards 2023 : फिफा वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मेस्सी, एमबापे आणि हालाड यांना मानांकनं )

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ७ लाखांपेक्षा जास्त हंगामी कामगारांची भरती होण्याची अपेक्षा आहे. लॉजिस्टिक्स, वेअर हाउसिंग, डिलिव्हरी इत्यादी क्षेत्रात नोकऱ्या वाढणार आहेत. सणासुदीचा अंदाज घेऊन कंपन्या चांगल्या पगारासह ४-५ पट इन्सेंटिव्हदेखील देण्याच्या तयारीत आहेत.

ई-काॅमर्स, सप्लाय चेनमध्ये मागणीत प्रचंड वाढ
ई-काॅमर्स क्षेत्रात डिलिव्हरीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी ४० टक्क्यांनी वाढली आहे. या क्षेत्रातील तसेच लाॅजिस्टिक कंपन्या हजाराेंच्या संख्येने हंगामी कर्मचारी भरती करत आहेत. त्यात बहुतांश नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने हाेतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.

– ७ ते ८ लाख नोकऱ्या पार्टटाईम, तात्पुरत्या आणि हंगामी कर्मचाऱ्यांना मिळू शकतात.
– २३ टक्के भरती यापैकी झालेली आहे.
– ४ लाख लाेकांना २०२२ मध्ये हंगामी नाेकऱ्या मिळाल्या हाेत्या.
– २० ते २५ टक्के

ई-कॉमर्स क्षेत्रातील विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.
– ६९ टक्के कंपन्या अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात.
– २० टक्के कंपन्या हंगामी कर्मचाऱ्यांना नियुक्त करतील.
– १८ टक्के नोकर भरतीत वाढ डिसेंबरमध्ये कंपन्या करू शकतात.

  • -१५% कर्मचाऱ्यांची मागणी वाढली वेअर हाऊसिंग क्षेत्रात.
    – ४०% वाढ डिलिव्हरी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मागणीत झाली आहे.
    – ४०% लाॅजिस्टिक क्षेत्रात हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.