कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या ७४ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यावर अतिरिक्त ३२ फेऱ्या जाहीर करण्यात आल्या यानंतर आता कोकण मार्गावर गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते ठोकूर दरम्यान रोज धावणारी विशेष गाडी जाहीर करण्यात आली आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ AC डबल डेकर बस सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल! )
विशेष गाडी
- १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये 01153/01154 ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री सव्वा दहा वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता कर्नाटकमधील ठोकुरला पोहोचेल.
- परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक १४ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ठोकूर येथून संध्याकाळी साडेसात वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
गाडीचे थांबे – ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमटा, गोकर्ण रोड, मुर्डेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड, बिंदुर, कुन्दापुरा, मुलकी आणि सुरतकल या स्थानकांवर थांबे घेत कर्नाटकमधील ठोकूर पर्यंत ही गाडी धावेल.
Join Our WhatsApp Community